IPL 2022: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी

आदित्य ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच पुण्यात अशीच बैठक घेणार असल्याचे सांगितले गेले आहे.
IPL 2022 News
IPL 2022 NewsDainik Gomantak | IPL 2022 News

महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) बुधवारी 26 मार्चपासून मुंबई आणि पुणे येथे होणाऱ्या आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामन्यांसाठी संपूर्ण लसीकरण केलेल्या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे, पण त्यांची संख्या स्टेडियमच्या क्षमतेच्या 25 टक्केच असणार आहे. (IPL 2022 Good news for fans spectators allowed to enter stadium)

IPL 2022 News
ISL स्पर्धेत गतविजेत्या मुंबई सिटीला जोरदार धक्का

राज्य सरकारने सायंकाळी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, कोविड-19 (covid-19) च्या प्रकरणांमध्ये झालेली घट लक्षात घेता, प्रेक्षकांची संख्या 25 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे आणि ज्या प्रेक्षकांना पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे त्यांनाच स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. (IPL 2022 News)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BBCI) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्यासोबत आयपीएलच्या आयोजनाबाबत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र सरकारने बुधवारी हा निर्णय घेतला आहे. यावेळी आयपीएलमध्ये 10 संघ सहभागी होतील. या बैठकीला राज्य सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह एमसीएचे प्रमुख विजय पाटील आणि सर्वोच्च परिषदेचे सदस्य अजिंक्य रायक आणि अभय हडप, कोषाध्यक्ष जगदीश आचरेकर देखील उपस्थित होते. बैठकीनंतर, आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आयपीएल सुरळीत पार पाडण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे जी आणि मी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका आणि आयपीएल, बीसीसीआयसह पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली आहे.

IPL 2022 News
BCCI Contracts: अजिंक्य रहाणे-चेतेश्वर पुजारा अन् हार्दिक पांड्याला A ग्रेडमधून डिस्चार्ज

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मुलागा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच पुण्यात अशीच बैठक घेणार असल्याचे सांगितले गेले आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात होणार्‍या आयपीएलचे सामने परदेशात होणार नाहीत याची खात्री देतो. महाराष्ट्र आणि देशासाठी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही मोठी उभारी असणार आहे, त्यामुळे क्रिकेटप्रेमींचे मनोबल आणि जोश आणखी वाढला आहे. यापूर्वी असे कळले होते की आयपीएलचे सर्व संघ 14 किंवा 15 मार्चपासून सराव सुरू करतील, त्यासाठी येथे पाच सराव स्थळे निवडण्यात आली आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे सर्व संघ 14 किंवा 15 मार्चपासून सराव सुरू करतील, ज्यासाठी पाच सराव स्थळे ओळखण्यात आली आहेत. IPL 2022 26 मार्चपासून सुरू होणार असून मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) चे वांद्रे कुर्ला कॅम्पस, ठाण्याचे एमसीए स्टेडियम, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे मैदान, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे मैदान आणि रिलायन्स कॉर्पोरेट पार्क मैदान यांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे आणि याचा सराव स्थळे म्हणून वापर केला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com