State Assembly Budget 2022: अधिवेशनाच्या पहिल्याचं तासात गोंधळ आणि घोषणाबाजी

यंदाचे अधिवेशन हे ठाकरे सरकारच्या काळातील सर्वाधिक कालावधीचे असे अधिवेशन आहे. यंदा 3 मार्च ते 24 मार्च या कालावधीत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे.
Maharashtra Assembly Budget 2022
Maharashtra Assembly Budget 2022Dainik Gomantak |Maharashtra Assembly Budget 2022 News
Published on
Updated on

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या कामकाजात प्रामुख्याने राज्यपालांचे अभिभाषण, राज्यपालांच्या भाषणावर अभिनंदनाचा ठराव आणि भाषणावर चर्चा असा पहिल्या दोन दिवसाचा कार्यक्रम असणार आहे. (Maharashtra Assembly Budget 2022 News)

Maharashtra Assembly Budget 2022
IPL 2022: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी

मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण, राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची झालेली ईडी चौकशी, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची ईडी चौकशी, ऊर्जामंत्र्यांनी दिलेले वीज तोडण्याचे आदेश, मदत व पुनर्वसन विभागाची ढिसाळपणा, या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जेत आहे. या सर्वांला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार (MahaVikas Aghadi) सज्ज झाली आहे. सरकार विरुद्ध भाजप (BJP) असा संघर्ष आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

याच अधिवेशनात 2022-23 साठीचा अर्थसंकल्प देखील मांडला जाणार आहे. हा अर्थसंकल्प 11 मार्च (शुक्रवार) रोजी सभागृहात सादर केला जाणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. एकीकडे महागाईचा भडका उडत आहे तर अशावेळी राज्य सरकार (State Government) जनतेला कशाप्रकारे दिलासा देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच या अधिवेशनाकडे राज्यातील अवघ्या जनतेचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Assembly Budget 2022
RBI ने 'या' बँकेचे लायसन्स केले रद्द

यंदाचे अधिवेशन हे ठाकरे सरकारच्या काळातील सर्वाधिक कालावधीचे असे अधिवेशन आहे. यंदा 3 मार्च ते 24 मार्च या कालावधीत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या (election of assembly speaker) निवडणूकीबाबत 9 मार्च रोजी राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना देखील पत्र पाठविले आहे. पण या पत्राला अद्याप राज्यपालांनी काहीही उत्तर दिलेले नाहीये. आता पुन्हा राज्यपालांना स्मरणपत्र देण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे.

पहिल्याच दिवशी म्हणजे 3 मार्चला राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे 3 मार्चला सकाळी 11 वाजता विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहातून दोन्ही सभागृहांना संबोधून अभिभाषण करतील. राज्यपालांच्या अभिभाषणाने पहिल्या दिवसाची सुरूवात होईल, तर विधानसभा आणि विधान परिषदेतील दिवंगत आमदारांचा शोक प्रस्तावही पहिल्याच दिवशी मांडण्यात येणार आहे.

Maharashtra Assembly Budget 2022
'महाराष्ट्र झुकेगा नहीं’...फडणवीसांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा

जमीन खरेदी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मंत्री नवाब मलिक यांचा अद्यापही राजीनामा घेण्यात न आल्याने विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे. याचविषयी पत्रकार परिषदेत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की, अटकेचं कारण योग्य नसल्याने नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाम आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com