38 killed on Konkan railway line in 10 months Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway: दहा महिन्यांत रेल्वे रुळावर 38 जणांचा मृत्यू

रेल्वे रुळावरून निष्काळजीपणामुळे चालल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून काहीजण दारुच्या नशेत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: राज्यात गेल्या दहा महिन्यांत कोकण रेल्वे रुळावर (Konkan Railway Line) एकूण 38 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये अज्ञातांची संख्या जास्त आहे. 38 जणांपैकी 20 जण अज्ञात व्यक्ती आहेत. कोकण रेल्वे रुळावर 38 जणांच्या मृत्यूंमध्ये कामगार तसेच परप्रांतियांची संख्या जास्त असल्याचे तपासकामात निष्पन्न झाले आहे.

ज्या मृतदेहांची ओळख पटलेली आहेत, त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करून संबंधित कुटुंबियांकडे सुपुर्द केले आहेत. रेल्वे रुळावरून निष्काळजीपणामुळे चालल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून काहीजण दारुच्या नशेत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

जूनमध्‍ये सर्वाधिक बळी

रेल्वे रुळावर सर्वाधिक मृत्यू हे जूनमध्ये झाले आहेत. एकूण 10 जणांचा मृत्‍यू झाला. जुलै महिन्यात 6, मार्चमध्ये 4, एप्रिलमध्ये 5, जानेवारी, मे आणि सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी 3, फेब्रुवारीमध्ये 1, तर ऑगस्ट महिन्यात एकाचाही मृत्यू झाला नाही. सुरवातीच्या सहा महिन्यांत 27 जणांचा मृत्यू झाला होता. यात 14 जण अज्ञात आहेत. 2020 मध्ये मृतांची संख्या कमी होती. आता या संख्येत वाढ झालेली आहे, अशी माहिती कोकण रेल्वे पोलिसांकडून मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT