हवामान कृतीसाठी अंडर 2 कोएलिशनकडून (Under2 Coalition) महाराष्ट्र राज्याला प्रादेशिक नेतृत्वाचा जागतिक पुरस्कार (World Awards) प्राप्त झाला आहे. स्कॉटलंड येथे अंडर 2 कोएलिशनच्या तीन पुरस्कारापैकी एक पुरस्कार मिळवणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. वातावरण प्रदुषण संरक्षणासाठी राज्यस्तरावर केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्कॉटलंडमध्ये हा पुरस्कार स्विकारला असून हा पुरस्कार स्वीकारणारे ते देशातले पहिले तरुण पर्यावरण मंत्री ठरले आहेत.
देशात असो वा जगात झपाटयाने हवामान बदल होत आहे. या वाढणाऱ्या हवामान बदलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या COP26 या जागतिक व्यासपीठाने महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली. आणि स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 परिषदेत महाराष्ट्र राज्याला Inspiring Regional Leadership या पुरस्काराने गौरवण्यात आले. या परिषदेला उपस्थित असलेले राज्याचे तरूण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा पुरस्कार स्कॉटलंड येथे स्वीकारला.
महाराष्ट्र सरकारने पर्यावरणात झालेल बदल आणि ते थांबविण्यासाठी केलेल्या विविध भागीदारी आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची COP26 परिषदेने विशेष दखल घेतली. आणि COP26 परिषदेत महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला आणि देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो, अशा भावना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या. या परिषदेला उपस्थित राहून ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली.
"स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership साठी पुरस्कार मिळाला. आपल्या Climate Partnerships & Creative Climate Solutions ची येथे विशेष दखल घेतली. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो." असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.