Local Railway Dainiok Gomantak
महाराष्ट्र

मध्य रेल्वेचा तब्बल 36 तासांचा 'मेगाब्लॉक'

ठाणे (Thane) आणि दिवादरम्यान रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरु असल्याने मध्य रेल्वेकडून 36 तासांचा मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हा मेगाब्लॉक शनिवारी दुपारी 2 वाजता सुरु होऊन सोमवारी पहाटे 2 पर्यंत काम सुरु राहणार आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकल रेल्वेला ओळखलं जातं. मात्र ठाणे आणि दिवादरम्यान रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरु असल्याने मध्य रेल्वेकडून 36 तासांचा मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हा मेगाब्लॉक शनिवारी दुपारी 2 वाजता सुरु होऊन सोमवारी पहाटे 2 पर्यंत काम सुरु राहणार आहे. दरम्यान ठाणे (Thane) आणि कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर लोकल धावणार नाही. त्याचबरोबर अप आणि डाऊन मार्गावरील सगळ्या लोकल गाड्या (Local Railway) ठाणे आणि कल्याण दरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे ठाकुर्ली, कोपर, कळवा या स्थानकावरील लोकल सेवा बंद राहणार आहे. त्यासंबंधीची माहीती मध्य रेल्वेकडून (Central Railway) देण्यात आली आहे.

दरम्यान, दिवा-ठाणे दरम्यान सुरु असणाऱ्या रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी मध्य रेल्वेकडून युध्दपातळीवर काम सुरु असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आल आहे. यासाठी शनिवार, रविवार, आणि सोमवारी मध्य रेल्वेवर तब्बल 36 तासांचा मोठा मेगाब्लॉक असणार आहे. शिवाय या मेगाब्लॉक दरम्यान मुंबई (Mumbai) ते कर्जत, अबरनाथ, कसारा, बदलापूर या मार्गावरुन धावणाऱ्या सगळ्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्या या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान वळविण्यात आल्या आहेत.

शिवाय, मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरु असल्याने मध्ये रेल्वेने वेळापत्रकामध्येही बदल केला आहे. यानुसार काही मेल गाड्या आणि लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारपासून सकाळी अप आणि डाऊन मार्गावरील सगळ्या लोकल गाड्या त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार मार्गावरुन धावतील. मात्र रद्द झालेल्या गाड्यांची संपूर्ण माहीती तुम्हाला https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत रेल्वेच्या वेबसाइटवर मिळेल. मात्र यामध्ये प्रवशांची गैरसोय झाल्यामुळे रेल्वेकडून खेद व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT