Crime News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Palghar: सोळा वर्षीय मुलीवर आठ जणांकडून बलात्कार, बंद बंगल्यात केले अमानुष कृत्य

या घटनेने पालघर परिसरात खळबळ माजली आहे.

Pramod Yadav

एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यात माहीम परिसरातील पानेरी येथे बंद असलेल्या एका बंगल्यामध्ये ही घटना घडली. सातपाटी सागरी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, आठही जणांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेने पालघर परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर रोजी संध्याकाळी पीडित मुलगी बेपत्ता झाली. पीडितेच्या वडिलांनी 17 डिसेंबरला मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार सातपाटी पोलीस ठाण्यात दिली. मुलीला फोन लावला असता ती फोनवर फक्त रडते अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुलीचा शोध घेतला.

आठ आरोपींपैकी एक जण पीडित मुलीला ओळखत होता, त्याने तिला बोलवले त्याने मुलीला माहीम परिसरातील पानेरी येथे बंद असलेल्या एका बंगल्यामध्ये नेले. याच ठिकाणी त्याच्यासह त्याच्या मित्रांनी या मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी आठ आरोपीं विरोधात पोक्सोसह विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT