Rajasthan Royals New Jersey
Rajasthan Royals New Jersey X/rajasthanroyals
क्रीडा

IPL 2024: चहलने लाँच केले राजस्थानचे 'रॉयल्स' किट, पाहा काय आहेत नव्या जर्सीची वैशिष्ट्ये

Pranali Kodre

Yuzvendra Chahal unveiled Rajasthan Royals new Jersey Ahead Of IPL 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याच्या तीन आठवडे आधीच राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या या १७ व्या हंगामासाठी नवी जर्सी लाँच केली आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलने राजस्थानची ही जर्सी लाँच केली आहे.

राजस्थानने सोमवारी (4 मार्च) एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात चहल राजस्थानची जर्सी डिझाईन करताना दिसत आहे. त्यानंतर तो एका जर्सीमध्ये दिसतो, जी आगळी -वेगळी आणि रंगेबीरंगी होती. ज्यात ट्रकचेही चित्र होते आणि छत्र्याही दिसत आहेत.

याबद्दल तो संघातील स्टार खेळाडू जॉस बटलरही मेसेज करून विचारतो की जर्सी कशी आहे. ते पाहून बटलर त्याला ही जर्सी चांगली नसल्याचे सांगतो. त्यानंतर संघाचा कर्णधार संजू सॅमसनही त्याला सांगतो की जर्सी फक्त तुझ्यावरच चांगली वाटत आहे.

यानंतर अखेरीस चहल ती जर्सी घालतो, जी जर्सी घालून राजस्थान रॉयल्सचे खेळाडू आयपीएल 2024 स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सने आणखी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या आयपीएल २०२४ मधील जर्सीमधील घटकांबद्दल माहिती दिली आहे. त्यात दिल्याप्रमाणे ही जर्सी योद्ध्याची तत्व दाखवणारी आणि राजस्थानचे गुणधर्म, वैभवशाली वारसा आणि संस्कृती दाखवणारी आहे.

त्यावरील ढालीसारखे चिन्ह राजस्थानच्या योद्ध्यांच्या सन्मानार्थ असून मैदानातील त्यांच्या लढण्याचे प्रतिक आहे. त्याचबरोबर राजस्थानमधील पॅलेस आणि किल्ल्यांच्या स्थापत्यकलेच्या प्रेरणेने केलेलं चिन्हही या जर्सीवर आहे.

त्याचबरोबर बांधणीचे डिझाईन राजस्थानच्या महिलांच्या पारंपारिक वेषभूशचे वैशिष्ट्य आहेत. त्याचबरोबर ठळक ठिबका आणि जर्सीचा रंग राजस्थानमधील आनंदाचे आणि उत्साहाचे प्रतिक आहे.

दरम्यान, राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या इतिहासातील पहिले विजेते आहेत. त्यांनी 2022 मध्येही आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

आता आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स 24 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पहिला सामना खेळणार आहेत. हा सामना राजस्थानच्या घरच्या मैदानावर म्हणजेच जयपूरला होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa Today News Live: कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी अखेर खूनाचा गुन्हा नोंद

Stray Dogs In Goa: भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले; किनारे बनले असुरक्षित

Shiroda News: शिरोड्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा

Cape News: सांडपाण्याची डबकी, सोकपिट भरले, झाडेझुडपे वाढली; केपे बाजार दुर्गंधीमय

SCROLL FOR NEXT