Yuvraj Singh | KL Rahul ICC
क्रीडा

IND vs AUS: 'कळतंच नाहीये की KL राहुल चौथ्या क्रमांकावर...' भारताच्या विजयानंतरही युवीने सुनावले खडेबोल

Yuvraj Singh: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला असला, तरी फलंदाजीची सुरुवात ज्याप्रकारे झाली, त्यावरून युवराज सिंगने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Yuvraj Singh react on India lost 3 wickets just for 2 runs against Australia in ICC ODI Cricket World Cup 2023:

रविवारी भारतीय क्रिकेट संघाने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केले. पण असे असले तरी भारतीय संघाची वरची फळी ज्याप्रकारे कोलमडली, ते पाहून युवराज सिंगने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन, तसेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यर यांच्या विकेट्स 2 धावांत आणि 2 षटकांच्या आत गमावल्या होत्या. हे तिन्ही फलंदाज एकही धाव न करता बाद झाले होते.

तसेच नंतर 8 व्या षटकात विराट कोहलीला मिचेल मार्शने झेल सोडल्यानंतर १२ धावांवर जीवदान मिळाले होते. नंतर या जीवदानाचा विराटने चांगला फायदा घेतला.

त्याने चौथ्या विकेटसाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केएल राहुलबरोबर 165 धावांची भागीदारी केली. पण तो 85 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर केएल राहुलने हार्दिक पंड्याबरोबर फलंदाजी करत भारताला 42 व्या षटकात विजय मिळवून दिला. केएल राहुल 97 धावांवर नाबाद राहिला.

दरम्यान, भारताने पहिल्या तीन विकेट्स झटपट गमावल्याबद्दल युवराजने ट्वीट केले की 'चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाने दबाव हाताळायला हवा! जेव्हा संघ पुन्हा त्यांचा डाव उभा करत होता, तेव्हा श्रेयस अय्यरकडून अजून चांगल्या विचाराने खेळण्याची गरज होती.'

'मला अजूनही कळत नाहीये की पाकिस्तानविरुद्ध शतक केल्यानंतरही केएल राहुल का चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत नाही. विराट कोहलीचा झेल सोडणे कदाचीत ऑस्ट्रेलियाला महागात पडू शकते. किंगला जीवदान देऊ नका, कारण नंतर तो विजय तुमच्यापासून दूर नेऊ शकतो.'

दरम्यान, युवीने म्हटल्याप्रमाणे पुढे सामन्यात विराटने जीवदानाचा फायदा घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उतलला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाज करताना 49.3 षटकात सर्वबाद 199 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने 46 आणि डेव्हिड वॉर्नरने 41 धावा केल्या.

भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आर अश्विन, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Goa Live News: ... आणि मांजरीने घेतला छत्रीचा आसरा!

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

King Kohli journey,: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

SCROLL FOR NEXT