Yuvraj Singh Samra Century Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: युवराज इज बॅक! 6 षटकार, 11 चौकार... न्यूझीलंडच्या गोलंदाजांना लोळवलं; ठोकलं वादळी शतक!

Yuvraj Singh Samra Century: जागतिक क्रिकेटमध्ये 'युवराज सिंह' हे नाव सहा षटकारांसाठी आणि मॅचविनिंग खेळीसाठी ओळखले जाते.

Sameer Amunekar

जागतिक क्रिकेटमध्ये 'युवराज सिंह' हे नाव सहा षटकारांसाठी आणि मॅचविनिंग खेळीसाठी ओळखले जाते. मात्र, २०२६ च्या टी-२० विश्वचषकात एका वेगळ्याच युवराजने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. कॅनडाच्या जर्सीत खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या १९ वर्षीय युवराज सिंह सामराने न्यूझीलंडच्या बलाढ्य गोलंदाजीचा धुरळा उडवत शानदार शतक झळकावले आहे. त्याच्या या खेळीने केवळ विश्वचषकात नवा इतिहास रचला नाही, तर दिग्गज युवराज सिंहच्या आठवणीही ताज्या केल्या आहेत.

कॅनडाचा सलामीवीर युवराज सिंह सामरा याच्या नावामागे एक खास कहाणी आहे. युवराजच्या वडिलांनी भारतीय क्रिकेटचा 'सिक्सर किंग' युवराज सिंहच्या नावावरूनच आपल्या मुलाचे नाव ठेवले होते. जणू "जैसा नाम, वैसा काम" ही म्हण सार्थ ठरवत या तरुणाने मैदानात पाऊल ठेवले. न्यूझीलंडविरुद्धच्या ग्रुप-डी सामन्यात त्याने ज्या पद्धतीने ६ उत्तुंग षटकार ठोकले, ते पाहून चाहत्यांना भारतीय युवराजची शैली आठवली.

सर्वात युवा शतकवीर

युवराज सामराने न्यूझीलंडविरुद्ध केवळ ६५ चेंडूत ११० धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये ११ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. अवघ्या १९ व्या वर्षी शतक झळकावून तो टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात शतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने ५८ व्या चेंडूवर चौकार मारत आपले शतक पूर्ण केले. त्याचा स्ट्राईक रेट १६९.२३ इतका राहिला, ज्यामुळे किवी गोलंदाज अक्षरशः हतबल झाले होते.

कॅनडा क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण

या शतकासह युवराजने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो कॅनडाचा पहिला फलंदाज ठरला आहे. इतकेच नाही तर टी-२० विश्वचषकाच्या मुख्य फेरीत शतक ठोकणारा तो कोणत्याही असोसिएट देशाचा पहिलाच खेळाडू ठरला. आपल्या खेळीदरम्यान त्याने या विश्वचषकातील ४०० वा षटकार खेचण्याचा मानही मिळवला. या ऐतिहासिक कामगिरीमुळे युवराज सामरा आता जागतिक क्रिकेटमधील एक नवी 'उगवती तारका' म्हणून समोर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT