Goa Crime: केरळचा पर्यटक गोव्यात आला अन्...! पणजीतील लॉजमध्ये आढळला मृतदेह; पोलीस तपास सुरू

Panjim: गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहरात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह लॉजमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Kerala Tourist Death Goa : गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहरात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह लॉजमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एल्डो अब्राहिम असे या मृत व्यक्तीचे नाव असून, ते केरळ राज्यातील वायनाड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पणजी शहराच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

लॉजमधील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली घटना

मिळालेली माहिती अशी की, एल्डो अब्राहिम यांनी पणजीतील एका लॉजमध्ये वास्तव्यासाठी खोली घेतली होती. मात्र, बराच वेळ खोलीतून कोणतीही हालचाल न झाल्याने आणि वारंवार हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने लॉजमधील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिले असता अब्राहिम मृतावस्थेत आढळले.

Goa Crime
Goa Accident: 'तो' चालक होता दारूच्या नशेत! पत्रकार कार्व्हालो मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंद; संशयिताची जामिनावर सुटका

घटनेची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. प्राथमिक पाहणीत मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. मृत्यू नैसर्गिक आहे की त्यामागे काही वेगळे कारण आहे, याचा शोध घेण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी 'गोवा वैद्यकीय महाविद्यालय' (GMC) येथे पाठवण्यात आला आहे.

Goa Crime
Goa Salt History: 1878चा ब्रिटिश-पोर्तुगीज तह होईपर्यंत गोव्यात 700 च्या वर मिठागरे होती; अस्तित्वाची जाणीव हीच खरी श्रीमंती

मृत्यूचे गूढ कायम

एल्डो अब्राहिम वायनाडहून गोव्यात नेमके कशासाठी आले होते आणि त्यांच्यासोबत इतर कोणी होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com