Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

Yashasvi Jaiswal Fifty: पदार्पणातच जयस्वालची 'यशस्वी' खेळी, चौकार मारुन पूर्ण केलं अर्धशतक

IND vs WI, 1st Test: वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली

Manish Jadhav

IND vs WI, 1st Test: यशस्वी जयस्वालने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण संस्मरणीय केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली.

डॉमिनिका कसोटीत कर्णधार रोहित शर्माचा नवा जोडीदार म्हणून मैदानात उतरलेल्या जयस्वालने त्याला चांगली साथ दिली. यादरम्यान त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. त्याने दुसऱ्या दिवशी चौकारासह 50 धावा पूर्ण केल्या. भारतीय सलामीवीराने 104 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

दरम्यान, यशस्वी शानदार फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येही त्याने दमदार कामगिरी केली होती, ज्याचे बक्षीस त्याला डॉमिनिकामध्ये मिळाले. येथे भारताकडून (India) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचे त्याचे स्वप्नही पूर्ण झाले. पदार्पणापासूनच शुभमन गिल फलंदाजीच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर गेला. याआधी गिल रोहितसोबत ओपनिंग करायचा.

दुसरीकडे, कसोटी पदार्पणातच अर्धशतक झळकावणारा यशस्वी 13 वा भारतीय सलामीवीर ठरला आहे. कसोटी पदार्पणात केवळ दोन भारतीय सलामीवीरांनी शतके झळकावली आहेत. सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) 2013 मध्ये आणि पृथ्वी शॉने 2018 मध्ये शतक झळकावले होते.

एकूण 16 भारतीय फलंदाजांनी कसोटी पदार्पणात शतके झळकावली आहेत, शेवटचे तीन फलंदाज रोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर आहेत. विशेष म्हणजे, हे तिघेही मुंबईचे आहेत. जयस्वाल या यादीत सामील होण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

प्रथम श्रेणी सरासरीमध्ये खूप पुढे

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी यशस्वीची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 15 सामन्यांमध्ये 80.21 सरासरी होती. कोणत्याही भारतीय फलंदाजाची ही तिसरी सर्वोच्च सरासरी आहे. विनोद कांबळी (88.37, 27 सामने) आणि प्रवीण अमरे (81.23, 23 सामने) यांची कसोटी पदार्पणापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली सरासरी होती.

कसोटी पदार्पण करण्यापूर्वी, सचिन तेंडुलकरची 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सरासरी 70.18 होती तर गिलची 23 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सरासरी 68.78 होती.

अश्विनचा जलवा

भारतीय गोलंदाजांसमोर विंडीज संघाचे फलंदाज या सामन्यात विशेष काही करु शकले नाहीत. वेस्ट इंडिजचा सलामीचा डाव 150 धावांवर आटोपला. अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने दमदार गोलंदाजी करताना 5 बळी घेतले.

त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाने 14 षटकांत 26 धावा देत 3 बळी घेतले. वेस्ट इंडिजकडून नवोदित अलिक अथानाजने सर्वाधिक 47 धावा केल्या.

त्याने 99 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार ठोकला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT