Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

Team India: भारताकडून 16 दिवसात पाच खेळाडूंचे T20I पदार्पण! वाचा कोणाची कशी कामगिरी

T20I Debut: भारतीय क्रिकेट संघाकडून गेल्या 16 दिवसात 5 खेळाडूंचे टी20 पदार्पण झाले आहे.

Pranali Kodre

Five Players T20I Debut for Team India in 16 Days:

भारतीय टी20 संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिकेला शुक्रवारपासून (18 ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. डब्लिनला झालेल्या पहिल्या सामन्यातून भारताकडून रिंकू सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण झाले.

त्यामुळे गेल्या 16 दिवसात तब्बल 5 खेळाडूंचे भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर येण्यापूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता. या दौऱ्यात 3 ते 13 ऑगस्ट दरम्यान भारताने 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली.

या मालिकेतून तिलक वर्मा, मुकेश कुमार आणि यशस्वी जयस्वाल या खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. दरम्यान, त्यांच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊ.

तिलक वर्मा -

20 वर्षीय तिलक वर्माने 3 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच प्रभावी कामगिरी करताना दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग षटकार ठोकण्याचा कारनामाही केला.

त्याने पहिल्या सामन्यात 22 चेंडूत 39 धावांची खेळी केली होती. त्याने आत्तापर्यंत ६ सामने खेळताना 1 अर्धशतकासह 173 धावा केल्या.

मुकेश कुमार -

वेगवान गोलंदाज मुकेश कुमारनेही 3 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यात 3 षटकात 24 धावा दिल्या होत्या, त्याला विकेट घेता आली नव्हती. त्याने आत्तापर्यंत 5 टी20 सामने खेळताना ३ विकेट्स घेतल्या आहेत.

यशस्वी जयस्वाल -

युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून त्याने 8 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातून पदार्पण केले.

पण त्याच्यासाठी पदार्पणाचा सामना फारसा खास ठरला नाही, तो 1 धावेवरच बाद झाला. पण त्यानंतर त्याने शानदार कामगिरी केली. त्याने आत्तापर्यंत भारताकडून 4 टी20 सामने खेळताना 1 अर्धशतकासह 114 धावा केल्या.

रिंकू सिंग -

रिंकूने 18 ऑगस्ट रोजी आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून पदार्पण केले. पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणही ठरले.

प्रसिद्ध कृष्णा -

प्रसिद्ध कृष्णा यानेही रिंकू प्रमाणे 18 ऑगस्ट रोजी आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून पदार्पण केले. त्याने पदार्पणात 4 षटकात 32 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या. त्याने यापूर्वी भारताकडून 14 वनडे सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT