Hardik Pandya statement Backfires as Nicholas Pooran hit him consecutive Two Sixes:
वेस्ट इंडिज संघाने भारताविरुद्ध रविवारी (13 ऑगस्ट) पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. य विजयासह वेस्ट इंडिजने टी20 मालिका 3-2 फरकाने जिंकली. वेस्ट इंडिजच्या या विजयात निकोलस पूरनने महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे या सामन्यानंतर हार्दिक पंड्याच्या एका विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
या टी20 मालिकेत पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर भारताने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करताना विजय मिळवला होता. त्यानंतर हार्दिकने निकोलस पूरनला डिवण्यासारखे विधान केले होते. त्याचे हेच विधान त्याच्या आणि भारतीय संघाच्या विरोधात उलटल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.
तिसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवल्यानंतर हार्दिकने म्हटले होते की 'निकी (पूरन) लवकर बाद झाला, त्यामुळे आमच्या वेगवान गोलंदाजांना राखून ठेवण्याची आणि अक्षरलाही त्याचा ४ षटकांचा कोटा पूर्ण करण्याची संधी मिळाली.'
'जर निकीला शॉट खेळायचेच असतील, तर त्याने माझ्याविरुद्ध खेळावेत, हीच आमची योजना होती. मला अशी स्पर्धा आवडते. मला माहित आहे तू हे ऐकणार आहे आणि पुढच्या सामन्यात तो माझ्याविरुद्ध अधिक आक्रमक होईल.'
तिसऱ्या सामन्यात पूरनने 20 धावांची खेळी केली होती. तसेच तो चौथ्या सामन्यातही १ धावेवर बाद झाला. मात्र, पाचव्या सामन्यात पूरनने शानदार 35 चेंडूत 47 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 1 चौकार आणि 4 षटकार मारले.
विशेष म्हणजे त्याने हार्दिक पंड्याविरुद्ध पहिल्या तीन चेंडूतील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरच सलग षटकार मारले. त्याचे हे दोन्ही षटकार वेस्ट इंडिजसाठी महत्त्वाचे ठरले.
त्याचमुळे हार्दिकला मालिका गमावल्यानंतर क्रिकेट चाहत्यांकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, पाचव्या टी20 सामन्यात भारताने सूर्यकुमार यादवच्या 61 धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 165 धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिजने 18 षटकात २ विकेट्स गमावत 171 धावा करून सामना सहज जिंकला.
वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंगने सर्वाधिक नाबाद 85 धावांची खेळी केली. तसेच या सामन्यात वेस्ट इंडिजसाठी किंग आणि निकोलस पूरन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी झालेल्या 107 धावांच्या शतकी भागीदारीही महत्त्वाची ठरली. त्यांच्या भागीदारीने वेस्ट इंडिजसाठी विजयाचा मार्ग सुकर झाला.
या सामन्यानंतर पूरनला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला. त्याने वेस्ट इंडिजला पहिले दोन सामने जिंकून देण्यातही महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने पहिल्या सामन्यात 41 धावांची खेळी केली होती, तसेच दुसऱ्या सामन्यात 67 धावांची खेळी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.