IRE vs IND, T20I: टीम इंडियात अर्धा डझन डावखुरे फलंदाज, आयर्लंडविरुद्ध झाला हा अनोखा विक्रम

Team India: आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताकडून 6 डावखुरे फलंदाज खेळल्याने अनोखा विक्रम नोंदवला गेला.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Six left handed batters featuring in India Playing XI against Ireland in 1st T20I :

आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात 3 सामन्यांची टी20 मालिका शुक्रवारपासून सुरू झाली असून पहिला सामना मलाहाईड, डब्लिन येथे झाला. या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार २ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात एक खास विक्रम नोंदवला गेला आहे.

या सामन्यासाठी भारताने ६ डावखुऱ्या फलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली होती. त्यामुळे पहिल्यांदाच असे झाले की भारताने एका टी२० सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये ६ डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना खेळवले.

यापूर्वी २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ डावखुरे खेळाडू खेळले होते. पण ६ डावखुऱ्या फलंदाजांना खेळवण्याची ही पहिलीच वेळ होती.

भारतीय संघात यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग हे डाव्या हाताने फलंदाजी करणारे खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये होते.

Team India
Jasprit Bumrah Video: बुमराहने गाजवलं कमबॅक! पहिल्याच ओव्हरमध्ये आयर्लंडला दोन झटके देत नोंदवला विक्रम

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात कर्णधार जसप्रीत बुमराहने अँडी बालबर्नी (४) आणि लोर्कन टकर (०) यांना बाद करत आयर्लंडला मोठे धक्के दिले होते. तसेच त्यानंतरही प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनीही आयर्लंडला झटपट धक्के दिले.

त्यामुळे ५९ धावातच ६ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर कर्टिस कॅम्फर आणि बॅरी मॅककार्थी यांनी ५७ धावांची भागीदारी केली. त्यामुळे आयर्लंडला १०० धावांचा टप्पा पार करता आला. पण कॅम्फर ३९ धावांवर बाद झाला. पण मॅककार्थीने अर्धशतकासह आयर्लंडला २० षटकात ७ बाद १३९ धावांपर्यंत पोहचवले. मॅककार्थीने ३३ चेंडूत ५१ धावांची नाबाद खेळी केली.

भारताकडून जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंगने १ विकेट घेतली.

Team India
IRE vs IND, 1st T20I: बॅरीने रचला इतिहास, भारताविरुद्ध अशी कामगिरी कोणीही केली नाही!

त्यानंतर १४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाज यांनी ४६ धावांची सलामी भागीदारी रचली. पण जयस्वालला ७ व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर क्रेग यंगने २४ धावांवर बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर क्रेगने तिलक वर्माला शुन्यावर बाद करत माघारी पाठवले.

यानंतर ६.५ षटकांपर्यंत खेळ झालेला असतानाच पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबला. यावेळी ऋतुराज १९ धावांवर आणि संजू सॅमसन १ धावेवर नाबाद होते. यानंतर सामना पुन्हा सुरू झाला नाही आणि त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com