Yashasvi Jaiswal Century AFP
क्रीडा

IND vs ENG: 9 चौकार अन् 5 षटकार... जयस्वालने ठोकले तुफानी शतक, इंग्लंडविरुद्ध 400 धावाही पार; पाहा Video

Yashasvi Jaiswal Century: यशस्वी जयस्वाल राजकोट कसोटीत आक्रमक खेळत शतकी खेळी केली आहे. हे त्याचे कसोटीतील तिसरे शतक आहे.

Pranali Kodre

India vs England, 3rd Test at Rajkot, Yashasvi Jaiswal Century:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) चालू झाला आहे. रोजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शतकी खेळी केली आहे.

फलंदाजीला पोषक असलेल्या रोजकोटमधील खेळपट्टीवर जयस्वालने तुफानी फटकेबाजी केली. इंग्लंडचा संघ तिसऱ्या दिवशी सर्वबाद झाल्यानंतर भारताकडून दुसऱ्या डावात सुरुवातीला रोहित शर्मासह सलामीला फलंदाजी करताना जयस्वालने सावध सुरुवात केली होती. त्याने खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी त्याचा वेळ घेतला.

यादरम्यान, त्याच्याविरुद्ध एकदा इंग्लंडने डीआरएस रिव्ह्यु देखील घेतला. परंतु, पारडे जयस्वालच्या पारड्यात पडले होते. दरम्यान, रोहितने 19 धावांवर विकेट गमावल्यानंतर शुभमन गिलला त्याने साथीला घेतला. यावेळी जयस्वालने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. त्याने इंग्लंडच्या जवळपास सर्वच गोलंदाजांवर हल्ला चढवला.

दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनविरुद्ध तर त्याने 27 व्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार सलग तीन चेंडूंमध्ये मारले. जयस्वालने आक्रमक खेळताना 122 चेंडूतच त्याचे शतक पूर्ण केले. शतकानंतर त्याने जोरदार सेलिब्रेशनही केले. त्याचे ड्रेसिंग रुममध्ये कौतुकही करण्यात आले.

मात्र, जयस्वालला शतकानंतर पाठीमध्ये वेदना होत असल्याने रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतावे लागले. तो जेव्हा रिटायर्ड हर्ट झाला होता, तेव्हा त्याने 133 चेंडूत 104 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 5 षटकार मारले होते.

इंग्लंडविरुद्ध 400 धावा पार

जयस्वालने आत्तापर्यंत कसोटीत 3 शतके केली आहेत. तसेच इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या कसोटी मालिकेतील हे त्याचे दुसरे शतक आहे. त्याने विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले होते.

दरम्यान, सध्या चालू असलेल्या कसोटी मालिकेत जयस्वालने 400 धावा पार केल्या आहेत. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 400 धावा करणारा विराटनंतरचा पहिलाच खेळाडू आहे. विराटने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत 593 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्माने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध चार कसोटीत 368 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT