KL Rahul & Sarfaraz Khan MayankAgarwal & Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final: केएल राहुलच्या जागी कोणाला मिळणार संधी? 'हे' 4 खेळाडू शर्यतीत; एकाच्या नावाने...

WTC Final: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून 2023 रोजी होणार आहे. ज्यामध्ये इंग्लंड आणि भारतीय संघ आमनेसामने असतील.

Manish Jadhav

WTC Final: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून 2023 रोजी होणार आहे. ज्यामध्ये इंग्लंड आणि भारतीय संघ आमनेसामने असतील. मात्र, याआधी केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.

आरसीबीविरुद्धच्या आयपीएल सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयपीएल आणि डब्ल्यूटीसी फायनलमधून बाहेर पडावे लागले.

दरम्यान, WTC फायनल ऐवजी टीम इंडियात KL राहुलची जागा कोण घेणार? हा मोठा प्रश्न आहे. राहुल बाहेर असताना सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) स्टँडबाय ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. जरी त्याला कसोटी संघात स्थान मिळाले नाही. राहुल बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागा घेण्यासाठी हे 4 खेळाडू शर्यतीत आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

हे चार खेळाडू केएल राहुलच्या जागी प्रबळ दावेदार

1. सर्फराज खान

सर्फराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाचे दरवाजे ठोठावत आहे, पण आजपर्यंत या युवा खेळाडूला संधी मिळाली नाही. सर्फराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे, त्याने रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात मुंबई संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. सर्फराजने 9 डावात 3 शतके आणि अर्धशतकांच्या मदतीने 556 धावा केल्या, ज्यात त्याची सरासरी 92.66 होती.

तसेच, 2019 पासून सर्फराजने रणजी ट्रॉफीमध्ये 123.3 च्या सरासरीने 2466 धावा केल्या आहेत, ज्यात 10 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे टीम इंडिया त्याच्या नावावर विचार करु शकते.

2. मयंक अग्रवाल

विकेटकीपर फलंदाज मयंक अग्रवाल हा आणखी एक खेळाडू आहे, ज्याचा केएल राहुलऐवजी टीम इंडियामध्ये समावेश केला जाऊ शकतो. मार्च 2022 मध्ये तो टीम इंडियासाठी (Team India) शेवटचा सामना खेळला होता.

टीम इंडियातून वगळल्यानंतर मयंकने रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करत कर्नाटकसाठी भरपूर धावा केल्या. त्याने रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात 13 डावात 82.50 च्या सरासरीने तीन शतके आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 990 धावा केल्या.

हा खेळाडू भारतीय संघाकडून परदेशी भूमीवर खेळला आहे. त्यामुळे मयंकचा अनुभव त्याच्या बाजूने जाऊ शकतो.

3- संजू सॅमसन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजू सॅमसन देखील केएल राहुलच्या जागी दिसणार आहे. त्याच्याकडे खूप अनुभव आहे. संजूने टीम इंडियासाठी 11 एकदिवसीय आणि 17 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 330 आणि 301 धावा केल्या आहेत.

लिस्ट ए मध्ये संजूने 58 सामन्यात 38.71 च्या सरासरीने 3446 धावा केल्या आहेत. संजूला मधल्या फळीत फलंदाजीचा अनुभव आहे. तो विकेटकीपिंगसह केव्हाही धावांचा वेग वाढवू शकतो.

4- सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो टीम इंडियासाठी एक कसोटी सामना खेळला आहे. केएल राहुलच्या जागी तो प्रबळ दावेदार मानला जात आहे.

सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी अप्रतिम फलंदाजी करत आहे. त्याच्या सध्याच्या फॉर्मच्या आधारे त्याला WTC फायनलसाठी संघात आणले जाऊ शकते. सूर्या जेव्हा आपल्या लयीत असतो तेव्हा गोलंदाजांना धडकी भरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT