WTC Final पूर्वी पुजारा - स्मिथ बनणार टिममेट्स, 'या' संघाकडून एकत्र खेळण्यास सज्ज

कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात आमने-सामने येण्यापूर्वी पुजारा आणि स्मिथ एकत्र खेळताना दिसणार आहेत.
Cheteshwar Pujara | Steve Smith
Cheteshwar Pujara | Steve SmithDainik Gomantak
Published on
Updated on

Cheteshwar Pujara and Steve Smith will play as a team mates: इंग्लंडमध्ये सध्या काऊंटी चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय कसोटी संघातील भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा ससेक्सकडून खेळत आहे. महत्त्वाचे म्हणजे तो ससेक्स संघाचे नेतृत्वही करत आहे. आता याच संघाकडून ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथही खेळताना दिसणार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जूनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाला इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. त्यावेळी पुजारा आणि स्मिथ आमने-सामने असणार आहे.

पण या सामन्यापूर्वी मात्र हे दोघेही ससेक्स संघात संघसहकारी म्हणून खेळताना दिसतील. याबद्दल बोलताना पुजारा म्हणाला आहे की एका चांगल्या मित्राचे आणि परिचित प्रतिस्पर्ध्याचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे.

Cheteshwar Pujara | Steve Smith
Steve Smith: कॅप्टन स्मिथची चलाखी! भारताला नेस्तनाभूत करताना Cricket नियमांमध्ये शोधली 'ही' पळवाट

स्मिथ आगामी कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी आणि ऍशेस मालिकेच्या तयारीच्या दृष्टीने मे महिन्यात ससेक्ससाठी तीन सामने खेळणार आहे.

पुजारा स्मिथबद्दल ससेक्स क्रिकेटशी बोलताना म्हणाला, 'त्याच्यासारखा प्रभाव असणारा खेळाडू संघात असणे चांगले आहे आणि खेळाडू त्याला ड्रेंसिग रुममध्ये भेटण्यास उत्सुक आहेत. आम्ही त्याच्याबरोबर चर्चा करू आणि त्याच्याकडून शिकण्याचाही प्रयत्न करू. तसेच तो कशाप्रकारे तयारी करतो, हे देखील पाहू. कारण त्याच्याकडे खूप अनुभव आहे.'

'तो संघात येण्याची आणि त्याने त्याचा अनुभव शेअर करण्याची आम्ही वाट पाहात आहोत. त्याच्याकडे क्रिकेटचे चांगले ज्ञान आहे आणि त्यामुळे त्याचेही मार्गदर्शन घेणे चांगले राहिल.'

Cheteshwar Pujara | Steve Smith
Cheteshwar Pujara Century: WTC फायनलपूर्वी चेतेश्वर पुजाराने सातासमुद्रापार ठोकले शतक!

पुजारा सध्या ससेक्सकडून दमदार कामगिरी करत आहे. त्याने गेल्या तीन सामन्यातच दोन शतकेही केले आहेत. तसेच पुजाराने पुढे सांगितले की तो यापूर्वी कधीही स्मिथबरोबर एकाच संघात खेळलेला नाही.

पुजारा म्हणाला, 'आम्ही बोलला आहे, पण सर्वाधिकवेळा आम्ही एकमेकांविरुद्धच खेळलो आहे. आम्ही कधीही एका संघात नव्हतो. त्यामुळे हे रोमांचक असेल आणि त्याच्या मनातले विचार समजून घेण्याचा आणि त्याला आणखी ओळखण्याचा मी प्रयत्न करेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारा कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. तसेच 12 जून हा या सामन्यासाठी राखीव दिवसही असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com