Travis Head Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

WTC 2023 Final: हेडचं शतक अन् स्मिथचा संयम, भारतासाठी डोकेदुखी! पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया 300 पार

कसोटी चॅम्पियनशीप फायनल 2023 मध्ये पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 300 धावांचा आकडा पार केला आहे.

Pranali Kodre

Australia vs India, ICC World Test Championship Final 2023 1st Day report: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बुधवारपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाला आहे. द ओव्हलवर होत असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे वर्चस्व दिसले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी द्विशतकी भागीदारी

पहिल्या दिवसाखेर या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 85 षटकात 3 बाद 327 धावा केल्या. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड 146 धावांवर नाबाद राहिला, तर स्टीव्ह स्मिथ 95 धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी पहिल्या दिवसाखेरपर्यंत 251 धावांची नाबाद भागीदारी केली.

त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच स्मिथला शतकाची आणि हेडला दिशतकाची संधी असणार आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर सलामीला उतरले. मात्र चौथ्याच षटकात मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला शुन्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.

मात्र, त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने मार्नस लॅब्युशेनला साथीला घेत डाव पुढे नेला. या दोघांनी डाव सावरताना अर्धशतकी भागीदारीही केली. पण पहिले सत्र संपण्यात काही षटकेच शिल्लक असताना वॉर्नर बाद झाला. त्याला शार्दुल ठाकूरने 22 व्या षटकात यष्टीरक्षक श्रीकर भारतकरवी झेलबाद केले.

वॉर्नरने 60 चेंडूत 43 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच २५ व्या षटकात मार्नस लॅब्युशेनही 62 चेंडूत 26 धावा करून मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. वॉर्नर आणि लॅब्युशेन यांच्यात 69 धावांची भागीदारी झाली होती.

पण, वॉर्नर आणि लॅब्युशेन बाद झाल्यानंतर मात्र स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड यांची जोडी जमली. या दोघांनीही नंतर दिवसाखेरपर्यंत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. हेडन काहीसा आक्रमक खेळ केला, तर स्मिथने संयमी खेळ करत त्याला चांगली साथ दिली.

हेडने केवळ 106 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. त्यामुळे तो कसोटी चॅम्पियनशीच्या अंतिम सामन्यात शतक करणारा पहिला खेळाडूही ठरला. दरम्यान, स्मिथनेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवशी वर्चस्व ठेवता आले आहे.

आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाला गुरुवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजताच सुरुवात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

Modi Cabinet Decision: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची खूशखबर! अग्निवीरांना मिळणार 2 वर्षांचा सेवा विस्तार; लाखो जवानांना मोठा दिलासा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

SCROLL FOR NEXT