Rohit Sharma Nearly falls during walking out for toss for WTC 2023 Final: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून कसोटी चॅम्पियनशीप २०२१-२३ स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाला आहे. हा सामना इंग्लंजमधील द ओव्हल मैदानात होत आहे. दरम्यान, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारताचा कर्णधार रोहित शर्मा पडण्यापासून थोडक्यात वाचला.
झाले असे की या अंतिम सामन्याच्या नाणेफेकीसाठी मैदानात येत असताना रोहित पायऱ्यांवरून खाली उतरत होता. त्याचवेळी पायऱ्या उतरत असताना त्याचा पाय अडखळला. पण त्याने स्वत:ला लगेचच सावरले. त्यामुळे तो पडण्यापासून वाचला आणि परिणामी मोठ्या दुखापतीचा धोकाही टळला.
या घटनेचा व्हिडिओ आणि फोटोही सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेक सोशल मीडिया युजर्सने याकडेही लक्ष वेधले की ज्यावेळी रोहित पायऱ्यांवरून उतरत होता, त्यावेळी सामना पाहणाऱ्या काही प्रेक्षकांच्या हातात एक बॅनर होते, ज्यावर 'विराट तू नेहमीच आमचा कर्णधार राहशील', असे बॅनर होते.
दरम्यान, कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 च्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक फिरकीपटू आणि चार वेगवान गोलंदाज असे संमिश्रण केले आहे.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.