WTC 2023 Final मध्ये विराट-रोहित घातली मोठ्या विक्रमाला गवसणी! धोनीलाही टाकलंय मागे

कसोटी चॅम्पियनशीप फायनलदरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावावर खास विक्रम झाला आहे.
Rohit Sharma | Virat Kohli
Rohit Sharma | Virat KohliDainik Gomantak

Rohit Sharma and Virat Kohli breaks MS Dhoni Record: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून (7 जून) कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना द ओव्हल मैदानावर सुरु झाला आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहली यांच्या नावावर खास विक्रम झाला आहे.

रोहित आणि विराट या दोघांसाठीही हा आयसीसी स्पर्धांतील सहावा अंतिम सामना आहे. त्यामुळे भारताकडून सर्वाधिक आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळण्याच्या बाबतीत विराट आणि रोहित संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. त्यांनी एमएस धोनीच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

Rohit Sharma | Virat Kohli
WTC 2023 Final: रोहित शर्माने जिंकला टॉस; अश्विन नाही, जडेजाला संधी, पाहा भारत - ऑस्ट्रेलियाची Playing XI

भारताचा माजी कर्णधार असलेल्या आणि तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा माजी कर्णधार धोनीने त्याच्या कारकिर्दीत आयसीसी स्पर्धांचे 5 अंतिम सामने खेळले आहेत. भारताकडून सर्वाधिक आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आहे. त्याने आयसीसी स्पर्धांचे 7 अंतिम सामने खेळले आहेत.

युवराजने 2000 आयसीसी नॉकआऊट टूर्नामेंट, 2002 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2003 वर्ल्डकप, 2007 टी२० वर्ल्डकप, 2011 वर्ल्डकप, 2014 टी20 वर्ल्डकप आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत.

Rohit Sharma | Virat Kohli
IND vs AUS: भारी योगायोग! फक्त रोहितच नाही, तर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचीही WTC Final मध्ये 'स्पेशल फिफ्टी'

तसेच विराटने 2011 वर्ल्डकप, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2014 टी20 वर्ल्डकप, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019-21 कसोटी चॅम्पियनशीप आणि आता 2021-23 कसोटी चॅम्पियनशीप या स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत.

रोहितने 2007 टी२० वर्ल्डकप, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2014 टी20 वर्ल्डकप, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019-21 कसोटी चॅम्पियनशीप आणि आता 2021-23 कसोटी चॅम्पियनशीप या स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत.

एमएस धोनीने 2007 टी20 वर्ल्डकप 2011 वर्ल्डकप, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2014 टी20 वर्ल्डकप आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत. यातील पहिल्या तीन स्पर्धांमध्ये त्याने नेतृत्व करताना भारताला विजेतेपदही मिळवून दिले आहे.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विराट, रोहित आणि युवराज या तिघांनीही 19 वर्षांखालील वर्ल्डकपचाही अंतिम सामना खेळला आहे. युवराजने २००० साली, रोहितने 2006 साली आणि विराटने 2008 साली 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com