Steve Smith | WTC 2023 Final Dainik Gomantak
क्रीडा

Steve Smith WTC Final Century: 4,4 अन् सेंच्यूरी, स्मिथचा पुन्हा ओव्हलवर जलवा! पाहा कसं केलं सेलिब्रेशन

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये भारताविरुद्ध गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने शतकी खेळी केली.

Pranali Kodre

Steve Smith Century in WTC 2023 Final: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना द ओव्हल मैदानावर बुधवारपासून (7 जून) सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (8 जून) स्टीव्ह स्मिथने शतक पूर्ण केले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात स्मिथ 95 धावांवर नाबाद होता. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रेविस हेडसह फलंदाजीला उतरला.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात म्हणजेच डावाच्या 86 व्या षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजविरुद्ध सलग दोन चौकार ठोकत त्याचे कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक साजरे केले. स्मिथने 229 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले.

त्याने हे शतक पूर्ण केल्यानंतर नेहमीप्रमाणे हेल्मेट आणि बॅट उंचावत सेलिब्रेशन केले. तसेच त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममध्ये त्याच्या संघसहकाऱ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. त्याचबरोबर त्याच्याबरोबर फलंदाजी करत असलेल्या ट्रेविस हेडनेही त्याचे अभिनंदन केले.

दरम्यान, स्मिथचे हे इंग्लंडमधील 7 वे शतक आहे. तसेच ओव्हलच्या मैदानावरील तिसरे शतक आहे. त्याने या मैदानावर चौथा कसोटी सामना खेळताना जवळपास 124 च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत.

याशिवाय स्मिथ आता ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये मॅथ्यू हेडनलाही मागे टाकले. हेडनने कसोटी कारकिर्दीत ३० शतके केली आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर ४१ शतकांसह रिकी पाँटिंग आहे. तसेच ३२ शतकांसह स्टीव्ह वॉ आहेत. त्यानंतर आता ३१ शतकांसह स्मिथ आहे.

ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी शतके करणारे फलंदाज (८ जून २०२३ पर्यंत)

  • 41 - रिकी पाँटिंग

  • 32 - स्टीव्ह वॉ

  • 31 - स्टीव्ह स्मिथ

  • 30 - मॅथ्यू हेडन

  • 29 - सर डॉन ब्रॅडमन

ट्रेविस हेडचे दीडशतक

स्मिथने शतक पूर्ण केल्यानंतर 89 व्या षटकात हेडने चौकारासह त्याचे दीडशतक पूर्ण केले. त्याने 164 चेंडूत दीडशतक पूर्ण केले. दरम्यान, त्याने सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक पूर्ण केले होते. तो पहिल्या दिवसाखेर 146 धावांवर नाबाद होता.

त्यानंतर आता त्याने दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच 150 धावांचा टप्पा पूर्ण केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आता पहिल्या डावात 350 धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT