Steve Smith: कॅप्टन स्मिथची चलाखी! भारताला नेस्तनाभूत करताना Cricket नियमांमध्ये शोधली 'ही' पळवाट

इंदूर कसोटीत भारताविरुद्ध विजय मिळवताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने चतुराई दाखवली.
Steve Smith
Steve SmithDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने इंदूरमध्ये भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला, तसेच या कसोटी मालिकेतील भारताने आघाडीही 2-1 अशी कमी केली.

दरम्यान, या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आई आजारी असल्याने मायदेशी परतला आहे. त्यामुळे या सामन्यात स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. त्याने या सामन्यात नेतृत्व करताना एक चालाखीही केली, जी ऑस्ट्रेलियासाठी फायदेशीर ठरत होती. पण त्याच्या चालाखीबद्दल चाहत्यांनी पकडली असून याबद्दल त्यांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Steve Smith
IND vs AUS: 'पाकिस्तानातील कसोटी बोरिंग झाल्या, म्हणूनच...' कॅप्टन रोहितचं टीकाकारांना चोख उत्तर

या कसोटी सामन्यात चेंडू भारतीय फलदाजांच्या बॅटच्या जवळून जात होता, तेव्हा ऑस्ट्रेलिया संघ जोरदार अपील करत होता. त्याचवेळी यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरी स्टंपवरील बेल्सही उडवत होता. त्यामुळे पंचांसमोर फलंदाज बाद आहे की नाही, याबद्दल संभ्रम निर्माण होत होता.

ज्यामुळे त्यांना निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवावा लागत होता. अशा वेळी तिसरे पंच यष्टीचीत तपासताना चेंडू बॅटला लागला आहे की नाही, हे देखील तपासतात.त्यामुळे जर एखाद्यावेळी संघाकडे रिव्ह्यू शिल्लक नसेल, तर ही रणनीती फायदेशीर ठरू शकते. कारण अशावेळी फलंदाज बाद आहे की नाही याची कल्पना गोलंदाजी करणाऱ्या संघाला येते. क्रिकेट नियमातील या पळवाटीचा फायदा स्मिथने आणि ऑस्ट्रेलियन संघाने घेतला.

स्मिथने या सामन्यात वापरलेली योजना माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने समजावून सांगितली आहे. त्याने स्मिथच्या नेतृत्वाचे कौतुकही केले आहे.

त्याने सांगितले की 'स्मिथने त्यांच्या गोलंदाजांचा वापर चांगल्या प्रकारे केला, तसेच त्याने यावरही लक्ष केंद्रीत केले की कोणता गोलंदाज योग्य एन्डने गोलंदाजी करू शकतो. तसेच तो डिआरएस घेतानाही खूप आत्मविश्वासाने भरलेला होता. पॅट कमिन्सकडे नेतृत्वाचा पुरेसा अनुभव आहे, पण स्मिथकडे खूप काही आहे.'

Steve Smith
Ind Vs Aus: PM मोदी अहमदाबाद टेस्टचा लुटणार आनंद, टीम इंडियाची लागणार कसोटी

पार्थिव म्हणाला, 'नियमात पळवाट आहे. स्टीव्ह स्मिथला याबद्दल पूर्ण कल्पना आहे आणि त्याने याचा फायदा घेतला. जर मैदानातील पंचांना खात्री असेल की फलंदाज यष्टीचीत आहे की नाही, तर त्यांनी तिसऱ्या पंचांकडे जाण्यापासून स्वत:ला थांबवले पाहिजे. तिसऱ्या पंचांनी यष्टीचीतची समीक्षा तेव्हाच करावी, जेव्हा अपील केवळ यष्टीचीतसाठी झाले असेल, हेच आदर्शवत आहे. जोपर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार झेलबाद किंवा पायचीतसाठी डिआरएसचा वापर करत नाही, तोपर्यंत तिसऱ्या पंचांनी चेंडू बॅटला लागला की नाही, हे तपासू नये.'

दरम्यान, स्मिथ सध्या ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा उपकर्णधार असला, तरी यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. तो 2014 ते 2017 दरम्यान ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार होता. पण चेंडू छेडछाडी प्रकरणात त्याला त्याचे कर्णधारपद गमवावे लागले होते. त्यानंतर त्याला आता पुन्हा कसोटी संघाचे उपकर्णधार करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com