Australia | WTC 2023 Final Dainik Gomantak
क्रीडा

WTC 2023 Final: ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारताची दमछाक, दुसऱ्या दिवसाखेर दिडशेत अर्धा संघ तंबूत

कसोटी चॅम्पियनशीप फायनलच्या दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत भारताने पहिल्या डावात दिडशे धावांत ५ विकेट्स गमावल्या आहेत.

Pranali Kodre

WTC 2023 Final, India vs Australia, 2nd Day report: बुधवारपासून (7 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाला आहे. द ओव्हल मैदानावर सुरू असेलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर (8 जून) भारताने पहिल्या डावात 38 षटकात 5 बाद 151 धावा केल्या आहेत. अद्यापही भारत 318 धावांनी पिछाडीवर आहे.

दुसऱ्या दिवसाखेर भारताकडून अजिंक्य रहाणे 29 धावांवर नाबाद आहे. तसेच यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत 5 धावांवर नाबाद आहे.

दरम्यान. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 469 धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजीला उतरला होता. भारताकडून कर्णधा रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनीही सकारात्मक सुरुवात केली होती. त्यांनी 6 षटकातच 30 धावा केल्या होत्या.

पण चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर 15 धावांवर पायचीत झाला. त्याच्यानंतर पुढच्याच षटकात गिलला स्कॉट बोलंडने 13 धावांवर त्रिफळाचीत केले.

बोलंडने टाकलेला चेंडू खेळायचा की नाही या गोंधळात गिल होता, पण अखेर त्याचे खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट जाऊन स्टंपवर आदळला. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

पण तिसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच पुजाराला कॅमेरॉन ग्रीनने त्रिफळाचीत करत 14 धावांवर माघारी धाडले. त्याला पुजाराला चेंडूची दिशा ओळखता आली नाही. त्यानंतर काहीवेळातच विराटला मिचेल स्टार्कने बाद केले. त्याने टाकलेला चेंडू विराटच्या बॅटला स्पर्श करून दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथने पकडला. त्यामुळे विराट 14 धावांवर बाद झाला.

पण यानंतर अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा यांनी डाव सावरताना पाचव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. हे दोघेही संयमी खेळ करत होते. पण दुसरा दिवस संपण्यासाठी काही वेळच शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नॅथन लायनकडे चेंडू सोपवला.

लायननंही हा निर्णय योग्य ठरवत चांगल्या लयीत असलेल्या रविंद्र जडेजाला 48 धावांवर बाद केले. त्याने टाकलेला चेंडू स्पिन झाला आणि जडेजाच्या बॅट लागून स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्मिथच्या हातात गेला. त्यानंतर सामना संपेपर्यंत राहणे आणि भरतने आणखी यश ऑस्ट्रेलियाला मिळवून दिले नाही.

दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना मिचेल स्टार्क, स्कॉट बोलंड, कॅमेरॉन ग्रीन, पॅक कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 86 षटकांपासून आणि 3 बाद 327 धावांपासून सुरुवात केली. त्यावेळी पहिल्या दिवसाखेर नाबाद राहिलेली स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड हेच दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरले.

पहिल्या दिवसाखेर स्मिथ 95 धावांवर आणि हेड 146 धावांवर नाबाद होते.त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच स्मिथने शतक आणि हेडने दिडशतक पूर्ण केले.पण त्यानंतर पहिल्याच सत्रात या दोघांनीही विकेट्स गमावल्या. हेडला डावाच्या 92 व्या षटकात मोहम्मद सिराजने चूक करण्यास भाग पाडले.

त्याने टाकलेल्या चेंडूवर हेडने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या ग्लव्ह्जला लागला आणि मागे यष्टीरक्षक केएस भरतच्या हातात गेला. त्यामुळे हेडला विकेट गमावावी लागली. हेडने 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 25 चौकार आणि 1 षटकार मारला.

त्यानंतर कॅमेरॉन ग्रीनला मोहम्मद शमीने फार काळ टिकू न देता 6 धावांवर बाद केले. शमीने टाकलेल्या ऑफसाईड ऑफस्टंपवरील चेंडू ग्रीनच्या बॅटला लागून स्लीपमध्ये असलेल्या शुभमन गिलकडे गेला. गिलनेही चूक न करता झेल घेतला.

त्यानंतर स्मिथलाही शार्दुल ठाकूरने 99 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले. शार्दुलने ऑफसाईड ऑफला टाकलेल्या चेंडूवर स्मिथने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटची आतली कड घेऊन स्टंपवर आदळला. स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार मारले.

त्यानंतर मिचेल स्टार्क आणि ऍलेक्स कॅरी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिचेल स्टार्क 104 व्या षटकात बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आलेल्या अक्षर पटेलने केलेल्या डायरेक्ट थ्रोवर 5 धावांवर धावबाद झाला. पण तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने 400 धावांचा टप्पा पार केला होता.

त्यानंतर कॅरीने कर्णधार पॅट कमिन्सला साथीला घेत 8 व्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला आणखी भक्कम स्थितीत पोहोचवले. पण ही भागीदारी 115 व्या षटकात रविंद्र जडेजाने तोडली. त्याने कॅरीला 48 धावांवर असताना पायचीत पकडले. डिआरएस रिव्ह्यूमध्येही कॅरी बाद झास्याचे स्पष्ट दिसले.

यानंतर सिराजने झटपट उर्वरित दोन विकेट्स घेतल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 121.3 षटकात 469 धावांवर संपुष्टात आला. त्याने नॅथन लायनला 9 धावांवर त्रिफळाचीत केले आणि पॅट कमिन्सलाही स्लोअर बॉल टाकत 9 धावांवर असताना अजिंक्य रहाणेकडे झेल देण्यात भाग पाडले.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी फलंदाजीत वर्चस्व गाजवल्यानंतरही दुसऱ्या दिवशी 142 धावांत उर्वरित 7 विकेट्स गमावल्या.

भारताकडून पहिल्या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT