WTC 2023 Final: भारताकडून 469 धावांवर ऑस्ट्रेलिया सर्वबाद! एका क्लिकवर पाहा सर्व 10 विकेट्स

Video: कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील सर्व विकेट्स पाहा.
India vs Australia | WTC 2023 Final
India vs Australia | WTC 2023 FinalDainik Gomantak
Published on
Updated on

WTC 2023 Final, Australia 1st inning all wickets: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. द ओव्हलवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 121.3 षटकात 469 धावांवर संपला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. तसेच स्टीव स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली.

India vs Australia | WTC 2023 Final
WTC 2023 जिंकायची असेल, तर रोहितसेनेला करावी लागेल 52 वर्षांपूर्वीच्या 'त्या' कामगिरीची पुनरावृत्ती

दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सलामीला फलंदाजी केली. पण मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला शुन्यावरच माघारी धाडले. चौथ्या षटकात त्याचा झेल केएस भरतने झेल घेतला.

त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅब्युशेन यांनी डाव सावरत 69 धावांची भागीदारी केली. पण वॉर्नरला 22 व्या षटकात शार्दुल ठाकूरने 43 धावांवर आणि मार्नस लॅब्युशेनला 26 धावांवर मोहम्मद शमीने त्रिफळाचीत केले.

यानंतर मात्र स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरताना पहिल्या दिवसाखेरपर्यंत अडिचशेची नाबाद भागादारी केली होती. त्यांच्यामुळे पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 85 षटकात 3 बाद 327 धावा केल्या होत्या.

दुसऱ्या दिवशीही स्मिथ आणि हेडने चांगली सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच स्मिथने शतक आणि हेडने दिडशतक पूर्ण केले. पण त्यानंतर त्यांनी लगेचच विकेट्स गमावल्या. हेडला डावाच्या 92 व्या षटकात मोहम्मद सिराज एस भरतकडे झेल देण्यास भाग पाडले.

त्यानंतर शमीने 95 व्या षटकात कॅमेरॉन ग्रीनला 6 धावांवर स्वस्तात बाद केले. त्यांनंतर स्टीव्ह स्मिथही 99 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला शार्दुल ठाकूरने त्रिफळाची केले.

India vs Australia | WTC 2023 Final
WTC 2023 Final Video: अर्रर्रर्र! रहाणेकडून सुटला हेडचा कठीण कॅच, रोहित-शमीची रिऍक्शनही व्हायरल

त्यानंतर मिचेल स्टार्क आणि ऍलेक्स कॅरी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिचेल स्टार्क 104 व्या षटकात बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आलेल्या अक्षर पटेलने केलेल्या डायरेक्ट थ्रोवर 5 धावांवर धावबाद झाला.

पण त्यानंतर कॅरीने कर्णधार पॅट कमिन्सला साथीला घेत 8 व्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. पण ही भागीदारी ११५ व्या षटकात रविंद्र जडेजाने तोडली. त्याने कॅरीला 48 धावांवर असताना पायचीत पकडले.

यानंतर सिराजने नॅथन लायनला 9 धावांवर आणि पॅट कमिन्सलाही 9 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 122 व्या षटकात संपुष्टात आला.

दरम्यान, भारताकडून पहिल्या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com