WPL 2024, Delhi Capitals vs UP Warriorz
WPL 2024, Delhi Capitals vs UP Warriorz Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024: रोमांचक सामन्यात दिल्लीचा खेळ खल्लास; यूपी वॉरियर्स जिंकला; दिप्ती-ग्रेसची गोलंदाजी ठरली निर्णायक

Manish Jadhav

WPL 2024, Delhi Capitals vs UP Warriorz: महिला प्रीमियर लीग 2024 चा 15 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना यूपीने आठ गडी गमावून 138 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ 19.5 षटकांत 137 धावा करुन गडगडला. अशा प्रकारे यूपी वॉरियर्सने क्लोज मॅच 1 रनने जिंकली.

दरम्यान, दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत आठ गडी गमावून 138 धावा केल्या होत्या. ॲलिसा हेलीच्या नेतृत्वाखालील संघाने विशेष सुरुवात केली नाही. यूपीची विस्फोटक फलंदाज किरण नवगिरे दुसऱ्याच षटकात बाद झाली. तिला तीतास साधूने क्लीन बोल्ड केले.

किरणने केवळ पाच धावा केल्या. त्याचवेळी, कर्णधार हेली 29 धावा करुन बाद झाली. सात चेंडूंच्या आत संघाला तिसरा धक्का ताहिया मॅकग्राच्या रुपाने बसला. तिला अरुंधती रेड्डीने बाद केले. यूपीचे फलंदाज दिल्लीच्या गोलंदाजीपुढे स्ट्रगल करताना दिसले.

ग्रेस हॅरिसने 14, श्वेता सेहरावतने चार, पूनम खेमनारने एक, सोफी एक्लेस्टोनने आठ धावा केल्या. तर सायमा ठाकूर आणि गौहर सुलताना अनुक्रमे पाच आणि एक धावा करुन नाबाद राहिल्या. दिल्लीकडून तीतस साधू आणि राधा यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर शिखा, अरुंधती, जेस जोनासन आणि ॲलिस कॅप्सीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

दुसरीकडे, 139 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने 60 धावांची उत्कृष्ट खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का शफाली वर्माच्या रुपाने बसला. तिने कर्णधार मेग लॅनिंगसोबत संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

मात्र तिला मोठी खेळता आली नाही. तिने 12 चेंडूत 15 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सची दुसरी विकेट एलिस कॅप्सीच्या रुपाने पडली. तिला 11व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ग्रेस हॅरिसच्या गोलंदाजीवर सोफी एक्लेस्टोनने बाद केले.

दिल्लीची तिसरी विकेट कर्णधार मेग लॅनिंगच्या रुपाने आली. 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दीप्ती शर्माने तिला बाद केले. तिने आपल्या खेळीत 12 चौकारांच्या मदतीने 60 धावा काढल्या. दिल्ली कॅपिटल्सला चौथा धक्का जेमिमाह रॉड्रिग्जच्या रुपाने बसला. सायमा ठाकूरने तिला सोफी एक्लेस्टोनकरवी झेलबाद केले. 15 चेंडूत 17 धावा करुन ती बाद झाली.

ॲनाबेल सदरलँडच्या रुपाने दिल्लीला पाचवा धक्का बसला. तिला दीप्ती शर्माने बाद केले. सदरलँडला केवळ सहा धावा करता आल्या. दिल्लीची सहावी विकेट अरुंधती रेड्डीच्या रुपाने पडली. ती खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतली.

शेवटच्या दोन षटकांचा थरार

शेवटच्या दोन षटकांमध्ये घड्याळ्याचे काट फिरले. दीप्ती शर्माने 19व्या षटकात तीन बळी घेतले. यानंतर 20 व्या षटकात वॉरियर्सला तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग तीन विकेट मिळाल्या. यामध्ये ग्रेस हॅरिसने दोन बळी घेतले तर एक खेळाडू धावबाद झाला. अशा प्रकारे यूपी वॉरियर्सने रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करुन बाजी मारली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT