WPL 2024: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दाखवला दम-खम! यूपी वॉरियर्सचा 42 धावांनी पराभव

WPL 2024, Mumbai Indians vs UP Warriorz: या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 160 धावा काढल्या होत्या.
WPL 2024, Mumbai Indians vs UP Warriorz
WPL 2024, Mumbai Indians vs UP WarriorzDainik Gomantak

WPL 2024, Mumbai Indians vs UP Warriorz 14th Match: महिला प्रीमियर लीग 2024 चा 14 वा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 160 धावा काढल्या होत्या. मुंबईने यूपी वॉरियर्ससमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याच्या प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्सने केवळ 118 धावा केल्या आणि सामना 42 धावांनी गमावला.

यूपी वॉरियर्सचा या मोसमातील हा चौथा पराभव आहे. तर मुंबई इंडियन्सचा या मोसमातील हा चौथा विजय आहे. यासह मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर आरसीबी तिसऱ्या स्थानावर घसरली.

दरम्यान, मुंबईने यूपी वॉरियर्ससमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात विशेष झाली नाही. चमारी अटापट्टूने आपली शिकार बनवलेल्या हेली मॅथ्यूजच्या रुपाने संघाला पहिला धक्का बसला. हेलीला केवळ चार धावा करता आल्या.

त्याचवेळी, यास्तिका भाटिया नऊ धावा करुन बाद झाली. तिलाही चमारीनेच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुंबईसाठी संयमी खेळी खेळणारी नेट सिव्हर ब्रंट 35 धावा करुन बाद झाली. नेट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी झाली. अमेलिया कर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आली. मात्र संघाला चौथा धक्का कर्णधार हरमनप्रीतच्या रुपात बसला. सायमा ठाकूरने तिला क्लीन बोल्ड केले.

हरमनप्रीत 33 धावा करु शकली. याचदरम्यान, अमनजोत कौर आणि अमेलिया कर यांच्यात पाचव्या विकेटसाठी 13 धावांची भागीदारी झाली. अमनजोत सात धावा करुन बाद झाली. तर अमेलियाला 39 धावा करता आल्या. तिने सजीवन सजनासोबत सहाव्या विकेटसाठी 40 हून अधिक धावांची भागीदारी केली.

यूपीविरुद्ध 22 धावा केल्यानंतर सजना नाबाद राहिली. यूपीकडून चमारी अटापट्टूने 2 तर राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा आणि सायमा ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

WPL 2024, Mumbai Indians vs UP Warriorz
WPL 2024: बेथ आणि लॉरा जोडीने काढला अख्खा राग, गुजरात जायंट्सनं उघडलं खातं; RCB चा 19 धावांनी पराभव

यूपी वॉरियर्सच्या फलंदाजीची वाईट अवस्था

दरम्यान, 161 धावांचा पाठलाग करणाऱ्या यूपी वॉरियर्सची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. सलामीवीर किरण नवगिरेकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र ती केवळ 7 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर ॲलिसा हिलीही मोठी खेळी न खेळता 9 चेंडूत 3 धावा करुन बाद झाली. ॲलिसा हिलीनंतर चमारी अटापट्टूही 3 धावांवर बाद झाली.

यूपी वॉरियर्सने 15 धावांत 3 विकेट गमावल्या. यूपीचे अव्वल तीन फलंदाज दहाचा आकडाही पार करु शकले नाहीत. यानंतर ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा आणि श्वेता सेहरावतही खराब शॉट्स खेळून बाद झाले.

मुंबई इंडियन्सकडून सायका इशाकने 2 बळी घेतले. फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर हेली मॅथ्यूजने गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी केली आणि 1 बळी घेतला. तर शबनीम इस्माईलने गोलंदाजीच्या 4 षटकात केवळ 6 धावा देत 1 बळी घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com