Crime News: माणुसकीला काळिमा! 90 वर्षीय 'आजी'वर 4 नराधमांकडून सामूहिक अत्याचार; तोंडात कापडाचा बोळा कोंबून केलं पाशवी कृत्य

90 Year Old Woman Atrocities: मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली.
Madhya Pradesh Crime News
90 Year Old Woman AtrocitiesDainik Gomantak
Published on
Updated on

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुनासा भागात चार नराधमांनी एका 90 वर्षांच्या वृद्ध महिलेवर पाशवी अत्याचार केले. या नराधमांनी केवळ अत्याचारच केला नाही, तर या वृद्धेच्या गुप्तांगावर गंभीर वार करुन तिला मृत्यूच्या दारात ढकलले. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नराधमांच्या या कृत्यामुळे समाजातील सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही 90 वर्षीय वृद्ध महिला शेतातील एका झोपडीत एकटीच राहत होती. रात्रीच्या अंधारात तोंडाला कापड बांधलेले चार नराधम झोपडीत शिरले. त्यांनी वृद्धेचा आवाज दाबण्यासाठी तिच्या तोंडात कापडाचा बोळा घातला आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. हे नराधम इतक्यावरच थांबले नाहीत, तर या वृद्धेला जीवे मारण्याच्या उद्देशाने जवळच असलेल्या विहिरीत फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहाटेच्या सुमारास आजूबाजूच्या शेतात लोकांची हालचाल जाणवल्याने, पकडले जाण्याच्या भीतीने हे नराधम वृद्धेला रक्ताच्या थारोळ्यात शेतातच टाकून पसार झाले.

Madhya Pradesh Crime News
Madhya Pradesh Crime: वाघिणीचे नखं आणि दात कापले, काळ्या जादूने 'पत्नीला वश' करण्याचा प्रयत्न, मध्य प्रदेशातील धक्कादायक प्रकार

दुर्दैवाची बाब म्हणजे, गंभीर जखमी अवस्थेत ही वृद्ध माउली तब्बल 12 तास मदतीसाठी तडफत पडली होती. शुक्रवारी सकाळी जेव्हा काही लोक शेतात पोहोचले, तेव्हा त्यांना ही हृदयद्रावक अवस्था पाहायला मिळाली. वृद्धेच्या अंगातून इतका रक्तस्त्राव झाला होता की, ज्या खाटेवर ती पडली होती तो पूर्णपणे रक्ताने माखला होता. हा भयानक प्रकार पाहून ग्रामस्थ हादरुन गेले. त्यांनी तात्काळ पुनासा पोलीस (Police) आणि दुसऱ्या गावात राहणाऱ्या वृद्धेच्या मुलीला या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितेची सुटका केली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

Madhya Pradesh Crime News
Madhya Pradesh High Court: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; घातली ‘ही’ अट

पीडित वृद्धेने जेव्हा आपल्यासोबत घडलेला हा अमानवी प्रकार सांगितला, तेव्हा ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. पीडितेच्या मुलीने सांगितले की, तिची आई शेतातील घरात एकटीच राहत असे. काही दिवसांपूर्वी तिथे चोरीचा प्रयत्नही झाला होता, मात्र चोरट्यांना काही मिळाले नव्हते. ज्या क्रूरतेने हे कृत्य करण्यात आले, त्यावरुन हे चारही नराधम नशेत असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पीडित महिला बोलण्याच्या स्थितीत नसल्याने महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तिचा अधिकृत जबाब घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Madhya Pradesh Crime News
Madhya Pradesh Crime: माणुसकीला काळीमा! आईच्या मृत्यूनंतर मुलाने केले घृणास्पद कृत्य; पोलिस म्हणाले...

पुनासा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात नराधमांविरुद्ध सामूहिक अत्याचार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. समाजात घडलेल्या या अघोरी कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com