अँड्र्यू फ्लिंटॉफ WWE मध्ये 'द अंडरटेकर'ला देणार होता टक्कर, पण शेवटच्या क्षणी इंग्लिश दिग्गजानं फिरवली पाठ; काय घडलं नेमकं?

Andrew Flintoff WWE Contract: जागतिक क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठमोठ्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या.
Andrew Flintoff WWE Contract
Andrew FlintofDainik Gomantak
Published on
Updated on

Andrew Flintoff WWE Contract: जागतिक क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठमोठ्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. मात्र, क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर हा इंग्लिश स्टार चक्क WWE च्या रिंगणात उतरणार होता, ही बाब वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. अँड्र्यू फ्लिंटॉफला WWE कडून तीन वर्षांचा मोठा करार ऑफर करण्यात आला होता, परंतु एका कौटुंबिक मजबुरीमुळे त्याने हा प्रस्ताव नाकारला. या धक्कादायक वास्तवाचा खुलासा खुद्द फ्लिंटॉफने 'Overlap’s Stick to Cricket' या पॉडकास्टमध्ये केला असून त्यामुळे क्रीडा विश्वात पुन्हा एकदा त्याच्या नावाची चर्चा सुरु झाली.

2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (Cricket) निवृत्ती घेतल्यावर फ्लिंटॉफ काही काळ प्रसिद्धीच्या झोतातून दूर होता. निवृत्तीनंतर नक्की काय करायचे, असा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्या काळात त्याला टीव्ही शो आणि इतर अनेक ठिकाणांहून ऑफर्स येत होत्या, पण त्याला काहीतरी वेगळे करायचे होते.

फ्लिंटॉफने सांगितले की, निवृत्तीनंतर त्याचे वजन वाढले होते आणि तो अनफिट झाला होता. स्वतःला पुन्हा फिट करण्यासाठी त्याला एका मोठ्या प्रेरणेची गरज होती. लहानपणी त्याला WWE आवडत होते, त्यामुळे त्याच्या डोक्यात कुस्तीच्या रिंगणात उतरण्याचा विचार आला. त्याने आपला हा विचार स्काय नेटवर्कच्या 'लीग ऑफ देअर ओन' या शोच्या टीमला सांगितला आणि पुढे ही कल्पना थेट WWE चे सर्वेसर्वा विन्स मॅकमॅहन यांच्यापर्यंत पोहोचली.

Andrew Flintoff WWE Contract
Virat Kohli: विराट कोहलीची अचानक माघार! न्यूझीलंडविरूध्दच्या वनडे मालिकेपूर्वी चाहत्यांना धक्का

WWE ने फ्लिंटॉफची आवड पाहून त्याला आपल्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले. तिथे त्याने दोन आठवडे कठोर परिश्रम घेतले. त्याच्यातील ऊर्जा आणि ताकद पाहून WWE व्यवस्थापन प्रभावित झाले आणि त्यांनी फ्लिंटॉफला थेट तीन वर्षांच्या कराराचा मेल पाठवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याला थेट 'रॉयल रंबल' आणि 'रेसलमेनिया' सारख्या जागतिक दर्जाच्या इव्हेंट्समध्ये लढण्याची संधी देण्यात आली. मॅनचेस्टरमध्ये 'द अंडरटेकर' विरुद्ध सामना खेळण्याचीही त्याची योजना होती. जर हा करार झाला असता, तर फ्लिंटॉफ कदाचित आज WWE मधील एक मोठा रेसलर म्हणून ओळखला गेला असता.

Andrew Flintoff WWE Contract
Virat Kohli: विराट कोहलीची अचानक माघार! न्यूझीलंडविरूध्दच्या वनडे मालिकेपूर्वी चाहत्यांना धक्का

मात्र, इतकी मोठी संधी चालून आलेली असतानाही फ्लिंटॉफने ती नाकारली. यामागील कारण होते त्याचे कुटुंब. फ्लिंटॉफने स्पष्ट केले की, WWE मध्ये करिअर करण्यासाठी त्याला अमेरिकेत स्थायिक होणे आवश्यक होते. मात्र, त्याच्या मुलांनी अमेरिकेला जाण्यास साफ नकार दिला. त्यांच्या मुलांना इंग्लंडमध्ये राहून क्रिकेटच खेळायचे होते. आपल्या मुलांच्या इच्छेखातर आणि त्यांच्या भविष्यासाठी फ्लिंटॉफने WWE चा तो कोट्यवधींचा करार आणि जागतिक प्रसिद्धी सोडून दिली.

Andrew Flintoff WWE Contract
Virat Kohli: '..ये ऐसेही किंग नही है'! विराट कोहलीचे सरावाला प्राधान्य; हजारे करंडकमध्ये दिल्लीसाठी खेळणार 3रा सामना

अँड्र्यू फ्लिंटॉफने इंग्लंडसाठी (England) 79 कसोटी, 141 एकदिवसीय आणि 7 टी-20 सामने खेळले आहेत. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्याने बॉक्सिंगमध्येही नशीब आजमावले आणि एका सामन्यात विजयही मिळवला. बॉक्सिंगमधील या अनुभवानंतरच त्याने WWE चा विचार केला होता. जरी तो रेसलिंगच्या रिंगणात दिसला नसला, तरी आजही क्रिकेट चाहते त्याच्या मैदानातील ऐतिहासिक खेळी आणि त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे चाहते आहेत. एका वडिलांनी आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी स्वतःची मोठी संधी नाकारल्याचे हे उदाहरण खरोखरच कौतुकास्पद ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com