India Women Team Dainik Gomantak
क्रीडा

Women's T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी टीम इंडियाचा जोश पाहून तुम्हीही व्हाल आनंदी; Video

महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज असून त्यांच्या फोटोशुटचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Women's T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेत आठव्या महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघात रविवारी (12 फेब्रुवारी) सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे फोटोशुट पार पडले असून यादरम्यान एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

आयसीसी आणि भारतीय संघाच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय संघाच्या फोटोशुटचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. बीसीसीआयने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की 'हसू, गप्पा आणि खूप मजा.'

या व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय महिला क्रिकेटपटू फोटो काढत असताना मस्तीच्या मूडमध्ये आहेत. काही खेळाडू डान्स करत आहेत, तर काही जणी एकमेकींचे त्यांच्या मोबाईलमध्येही फोटो काढत आहेत.

तसेच एकमेकींबरोबर मस्ती करत आहेत. हरलीन देवोलने काही भांगडा स्टेप्सही करून दाखवल्या. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने दाखवलेला हा जोश चाहत्यांच्या पसंतीसही उतरत आहे.

दरम्यान, भारतीय संघ या स्पर्धेत गतउपविजेता म्हणून उतरत आहे. भारताला यापूर्वी 2020 मध्ये झालेल्या महिला टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता यंदा पुन्हा एकदा भारतीय संघ टी20 वर्ल्डकप विजयासाठी प्रयत्न करणार आहे. भारताचा या वर्ल्डकपसाठी बी ग्रुपमध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये भारतासह इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. त्यामुळे भारताला साखळी फेरीत पाकिस्ताननंतर वेस्ट इंडिज, इंग्लंड, आणि आर्यंलडविरुद्ध सामने होणार आहेत.

टी20 महिला वर्ल्डकप 2023 मधील भारतीय संघाचे साखळी फेरीचे वेळापत्रक

12 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

15 फेब्रुवारी - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

18 फेब्रुवारी - भारत विरुद्ध इंग्लंड - गाकेबेरा, वेळ - संध्या 6.30 वा.

20 फेब्रुवारी - भारत विरुद्ध आयर्लंड - गाकेबेरा, वेळ - संध्या 6.30 वा.

टी20 महिला वर्ल्डकप 2023साठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका शरवन, अंजली सारवानी, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

राखीव खेळाडू: एस मेघना, स्नेह राणा, मेघना सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT