India Women vs Pakistan Women: रविवारी (12 फेब्रुवारी) महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय महिला विरुद्ध पाकिस्तान महिला संघात सामना खेळवला जाणार आहे. हा या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान संघांचा पहिलाच सामना असल्याने या सामन्यातून दोन्ही संघ आपल्या वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करतील.
आठव्या महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान संघांचा ग्रुप बी मध्ये समावेश आहे. या दोन्ही संघात आत्तापर्यंत 13 महिला आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 10 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने 3 सामने जिंकले आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकप सामन्याबद्दल सर्वकाही
1. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना किती तारखेला होणार आहे?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना 12 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
2. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना कोठे खेळवला जाईल?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे.
3. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना किती वाजता खेळवला जाईल?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल.
4. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी२० वर्ल्डकपमधील सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकता.
5. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना तुम्ही 'Disney+ Hotstar' ऍपवर पाहू शकता.
यातून निवडले जाईल प्लेइंग इलेव्हन
भारतीय महिला संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका शरवन, अंजली सारवानी, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.
पाकिस्तान महिला संघ - मुनीबा अली, सिद्रा अमीन, बिस्माह मारूफ (कर्णधार), ओमामा सोहेल, निदा दार, आलिया रियाझ, सिद्रा नवाज (यष्टीरक्षक), फातिमा सना, नशरा संधू, जवेरिया खान, आयमान अन्वर, सादिया इक्बाल, आयेशा नसीम, तुबा हसन, सदफ शमास
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.