Vishwanath Dalvi: दळवींचे बंड शमल्यात जमा! पक्षातील एकीला दिले प्राधान्य; दामू नाईक यांनी काढली समजूत

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीत भाजपच्या वतीने रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने नाराज झालेले विश्वनाथ दळवी यांचे बंड शमल्यात जमा आहे.
Ponda by election vishwanath dalvi update
Ponda by election vishwanath dalvi updateDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंडा पोटनिवडणुकीत भाजपच्या वतीने रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने नाराज झालेले विश्वनाथ दळवी यांचे बंड शमल्यात जमा आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांची समजूत काढली होती.

'उमेदवार निवडीत माझ्यावर अन्याय झाला आहे, असे कार्यकत्यांसह मलाही वाटते. परंतु मी पक्षात गट पडू देणार नाही. पुढील काळात माझ्यावर पुन्हा अन्याय होणार नाही, याची आम्ही पक्षाकडून हमी घेऊ व लवकरच तोडगा काढू, असे विश्वनाथ दळवी यांनी स्पष्ट केले आहे. त्यावरून ते अपक्ष म्हणून पुढे जातील, अशी शक्यता मावळल्यात जमा असल्याचा निष्कर्ष राजकीय वर्तुळात काढला जात आहे.

भाजपकडून रितेश व विश्वनाथ यांच्यात स्पर्धा होती. भंडारी समाजाला दुखावणे धोक्याचे ठरेल, अशा शक्यतेमधून रितेश यांना उमेदवारी मिळेल, अशी अटकळ होती व झालेही तसेच, त्यामुळे दळवी नाराज बनले. त्यांच्या घरासमोर काल कार्यकत्यांनी एकत्र येत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Ponda by election vishwanath dalvi update
Ponda By Election: 'फोंड्यात कमळ फुलवणे हीच रवींना श्रद्धांजली'! दामू नाईकांचे प्रतिपादन; उमेदवार कोण? प्रश्नाला दिली बगल

दळवी यांनी उघड नाराजी व्यक्त केली नसली तरी धक्का बसला असल्याचे सांगत पुढील निर्णयासाठी १२ तासांची वेळ घेतली होती. त्यानुसार त्यांची भूमिका समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली आहे. दळवी हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याजवळचे मानले जातात. मुख्यमंत्री सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांती घेत आहेत. पुढील काही दिवसांत त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Ponda by election vishwanath dalvi update
Goa Politics: खरी कुजबुज; एकी राहणार की तुटणार?

रितेशचा प्रचार सुरु

१. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रितेश नाईक यांनी प्रचार प्रक्रियेला सुरवात केली आहे. जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचीं फळी त्यांनी सोबत घेतली आहे.

२. विश्वनाथ दळवी यांच्याशी काल दामू नाईक यांनी संवाद साधला होता. त्याचा प्रभाव पडल्याचे आता दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com