Women's T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, उपकर्णधारच आऊट!

T20 World Cup 2023: भारतीय महिला क्रिकेट संघाला T20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.
Smriti Mandhana & Harmanpreet Kaur
Smriti Mandhana & Harmanpreet KaurDainik Gomantak

Women's T20 World Cup, India vs Pakistan: भारतीय महिला क्रिकेट संघाला T20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. संघाची उपकर्णधार स्मृती मानधना पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही.

स्मृती मानधना अद्याप बोटाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरी झालेली नाही, ज्यामुळे ती रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यातून बाहेर पडेल.

क्षेत्ररक्षणादरम्यान स्मृती जखमी झाली

भारतीय महिला संघ टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सामन्याने करणार आहे. स्मृती मानधना या सामन्यात खेळू शकणार नाही.

26 वर्षीय मानधना या आठवड्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना जखमी झाली होती. याच कारणामुळे ती बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यातही खेळू शकली नाही.

Smriti Mandhana & Harmanpreet Kaur
Women's T20 World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का! पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही स्मृती मानधना?

प्रशिक्षकाने एक मोठी अपडेट दिली

पत्रकार परिषदेत प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर म्हणाले की, 'स्मृतीच्या बोटाला दुखापत झाली असून ती अत्तापर्यंत बरी आहे. त्यामुळे तिच्या खेळण्याची शक्यता नाही. चांगली गोष्ट म्हणजे, तिच्या बोटात कोणतेही फ्रॅक्चर नाही आणि आम्हाला आशा आहे की, ती दुसऱ्या सामन्यापासून उपलब्ध होईल.'

Smriti Mandhana & Harmanpreet Kaur
U19 Women's T20 World Cup: भारतीय महिलांचा श्रीलंकेला धोबीपछाड, सेमीफायनलच्या आशाही जिवंत

हरमनप्रीत कौर पूर्णपणे तंदुरुस्त आहे

माजी भारतीय क्रिकेटपटू कानिटकर यांनी सांगितले की, 'वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेदरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) झालेल्या खांद्याच्या दुखापतीतून ती पूर्णपणे बरी झाली आहे. ते पुढे म्हणाले की, 'हरमन खेळण्यासाठी फिट आहे. गेल्या दोन दिवसांत तिने नेटमध्ये सराव केला, ती पूर्णपणे फिट आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com