

आयपीएल २०२६ हंगामाची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहिलेला संजू सॅमसन आता चेन्नई सुपर किंग्जच्या संघातून खेळताना दिसणार आहे. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजासोबत झालेल्या ट्रेंडनंतर संजूचा चेन्नईत प्रवेश निश्चित झाला आहे. या बदलामुळे आयपीएलच्या समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयात संजू सॅमसननेही मोलाचा वाटा उचलला. विशेषतः शेवटच्या तीन सामन्यांत त्याने अर्धशतकी खेळी करत आपल्या फलंदाजीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर टीका करणाऱ्यांनाही गप्प बसावे लागले. आता तोच फॉर्म आयपीएलमध्ये कायम ठेवेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून संजू सॅमसनचे जोरदार स्वागत केले आहे. “वेलकम होम संजू सॅमसन” असे कॅप्शन देत एक खास इमोशनल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये महत्त्वाचे क्षण दाखवण्यात आले असून, चाहत्यांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही तासांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महेंद्रसिंह धोनीसोबत खेळण्याची संधी मिळणार असल्यामुळे संजूसाठी हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. चेन्नईचा अनुभवी संघ आणि त्यांची जिंकण्याची परंपरा लक्षात घेता, संजूला आपली क्षमता आणखी प्रभावीपणे दाखवण्याची संधी मिळणार आहे.
आता क्रिकेट चाहत्यांना संजू सॅमसनच्या या नव्या प्रवासाची उत्सुकता लागली आहे. त्याची आक्रमक फलंदाजी आणि नेतृत्वगुण चेन्नई सुपर किंग्जला आणखी बळकटी देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आयपीएल २०२६ मध्ये संजूची धमाकेदार खेळी पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.