India women's cricket team dainik gomantak
क्रीडा

Women's T20 World Cup: आज रंगणार भारत-पाकिस्तान थरार! कधी अन् कुठे होणार मॅच, जाणून घ्या संपूर्ण Details

भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघांत आज महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामना खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

India Women vs Pakistan Women: रविवारी (12 फेब्रुवारी) महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय महिला विरुद्ध पाकिस्तान महिला संघात सामना खेळवला जाणार आहे. हा या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान संघांचा पहिलाच सामना असल्याने या सामन्यातून दोन्ही संघ आपल्या वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करतील.

आठव्या महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान संघांचा ग्रुप बी मध्ये समावेश आहे. या दोन्ही संघात आत्तापर्यंत 13 महिला आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 10 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने 3 सामने जिंकले आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकप सामन्याबद्दल सर्वकाही

1. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना किती तारखेला होणार आहे?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना 12 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

2. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना कोठे खेळवला जाईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे.

3. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना किती वाजता खेळवला जाईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल.

4. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी२० वर्ल्डकपमधील सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकता.

5. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकपमधील सामना तुम्ही 'Disney+ Hotstar' ऍपवर पाहू शकता.

यातून निवडले जाईल प्लेइंग इलेव्हन

भारतीय महिला संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका शरवन, अंजली सारवानी, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

पाकिस्तान महिला संघ - मुनीबा अली, सिद्रा अमीन, बिस्माह मारूफ (कर्णधार), ओमामा सोहेल, निदा दार, आलिया रियाझ, सिद्रा नवाज (यष्टीरक्षक), फातिमा सना, नशरा संधू, जवेरिया खान, आयमान अन्वर, सादिया इक्बाल, आयेशा नसीम, ​​तुबा हसन, सदफ शमास

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT