Cansaulim Theft: कासावली परिसरात घरफोडी! सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू लंपास; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Theft News: कासावली परिसरात एका घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Cansaulim Theft
Cansaulim TheftDainik Gomantak
Published on
Updated on

कासावली परिसरात एका घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

चोरट्याने कपाटातील सोन्याच्या वस्तू आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची प्राथमिक माहिती आहे. घरच्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Cansaulim Theft
Rivona Temple Theft: गोव्यात आणखी एका मंदिरात दिवसाढवळ्या चोरी! केवण-रिवण येथील देवीच्या अंगावरील दागिने पळवले

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून संशयिताचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Cansaulim Theft
Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

परिसरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच घर बंद ठेवताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com