Stadium
Stadium Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: विश्वचषकापूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का, दुखापतीमुळे 'ही' धाकड स्पर्धेतून आऊट

दैनिक गोमन्तक

Women's T20 World Cup 2023, Hasini Perera OUT: आगामी T20 विश्वचषकात जगभरातील मोठे क्रिकेट संघ आमनेसामने असतील. याआधीच एका संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे श्रीलंकेच्या या स्टार क्रिकेटपटूला या जागतिक स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. आता तिच्या जागी बदलीची घोषणाही करण्यात आली आहे.

हसिनी परेरा बाहेर

दुखापतीमुळे श्रीलंकेने (Sri Lanka) अनुभवी क्रिकेटपटू हसिनी परेराला आगामी T20 विश्वचषकासाठी त्यांच्या 15 सदस्यीय संघातून वगळले आहे. हसिनी परेराचा मुख्य संघात समावेश करण्यात आला होता, परंतु सराव सत्रादरम्यान बोटाला दुखापत झाल्याने तिला बाहेर पडावे लागले. तिच्या जागी सत्य सांदीपनीचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारताविरुद्धचा शेवटचा सामना

27 वर्षीय हसिनी परेराने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध (India) खेळला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महिला आशिया कपमध्ये तिने भारताविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. विशेष म्हणजे जुलै 2022 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा वनडेही खेळला होता.

हसिनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने आतापर्यंत 38 एकदिवसीय आणि 56 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिने एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 538 धावा केल्या आहेत तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 550 धावा केल्या आहेत.

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेचा महिला संघ: चामारी अटापट्टू (कर्णधार), ओशादी रणसिंघे, हर्षिता समरविक्रमा, नीलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, अनुष्का संजीवनी, कौशिनी नुथियांगना, मलशा शेहानी, इनोका रणवीरा, सुगंधिका कुमारी, सुगंधिका कुमारी, अग्नीका कुमारी गुणरत्ने, अमा कांचना आणि सत्य सांदीपनी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

SCROLL FOR NEXT