Women Ashes 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Women Ashes 2023: इंग्लंडच्या महिला संघाची प्लेइंग 11 जाहीर, 'हे' 2 धाकड खेळाडू करणार पदार्पण

Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुरुषांच्या ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून विजय मिळवला.

Manish Jadhav

Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुरुषांच्या ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून विजय मिळवला. आता उद्या म्हणजेच 22 जूनपासून ऍशेस मालिकेतर्गंत महिला संघांमध्ये एकमेव कसोटी खेळली जाणार आहे.

यासाठी इंग्लंडच्या महिला संघाच्या प्लेइंग 11 ची घोषणा करण्यात आली आहे. नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.

2 खेळाडू पदार्पण करतील

इंग्लंड (England) महिला संघाने जाहीर केलेल्या 11 खेळाडूंपैकी दोन खेळाडू पदार्पण करणार आहेत. युवा गोलंदाज लॉरेन फाइलर आणि अनुभवी फलंदाज डॅनियल वयाट कसोटी पदार्पण करणार आहे. जिथे वयाट तूफानी फलंदाजी करते, लॉरेन फाइलर चेंडूने चमत्कार करते.

टॅमी बब्यूमोंट आणि एमा लम्बा इंग्लंड संघासाठी सलामीवीर असतील तर कर्णधार हीथर नाइट क्रमांक 3 वर फलंदाजीला येईल. नेट सीव्हर ब्रंट, सोफी डंकले आणि डॅनियल वयाट मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर दिसतील.

एमी जोन्स यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असेल, तर फिरकी विभागात अनुभवी सोफी एक्लेस्टोनचे नाव आहे. इंग्लंड संघाकडे केट क्रॉस, लॉरेन बेल आणि युवा गोलंदाज लॉरेन फाइलर हे वेगवान गोलंदाजांच्या रुपात असतील.

महिलांच्या ऍशेस कसोटीसाठी इंग्लंडची महिला प्लेइंग इलेव्हन

हीदर नाइट (सी), टॅमी ब्युमॉंट, एम्मा लॅम्ब, नॅट सीव्हर-ब्रंट, सोफिया डंकले, डॅनियल वयाट, एमी जोन्स, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल, लॉरेन फाइलर, केट क्रॉस.

कसोटीनंतर एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवली जाईल

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Australia) महिला संघादरम्यान हा कसोटी सामना 5 दिवस चालणार आहे. 2000 नंतर पहिल्यांदाच इंग्लंड त्यांच्या भूमीवर 5 दिवसांचा कसोटी सामना खेळणार आहे. या कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 आणि फक्त 3 एकदिवसीय सामने होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

Goa: गोव्याचा जन्मदर, मृत्यूदर किती आहे? वाचा ताजा अहवाल..

Bicholim: डिचोलीतील ‘पे पार्किंग’ प्रस्ताव अजूनही घुटमळतोय! कंत्राटदार कंपनीचा प्रतिसाद नाही; पालिकेसमोर प्रश्नचिन्ह

Goa Crime: कारमधून ओढून शेतात मारहाण, स्क्रूड्रायव्हर - फोन जप्त; रेहबर खान हत्याप्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला

Laxmidas Borkar: गोमंतपुत्राचा गौरव! स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार 'लक्ष्मीदास बोरकर' यांच्या सन्मानार्थ टपाल साहित्य प्रकाशित

SCROLL FOR NEXT