Ashes 2023: हायव्होल्टेज ड्रामा! ख्वाजा अन् रॉबिन्सन भर मैदानात भिडताच अँडरसनची मध्यस्थी, व्हिडिओ व्हायरल

पहिल्या ऍशेस सामन्यात उस्मान ख्वाजा आणि ऑली रॉबिन्सन यांच्यात शाब्दिक चकमक घडल्याचे दिसले.
Usman Khawaja and Ollie Robinson
Usman Khawaja and Ollie RobinsonDainik Gomantak
Published on
Updated on

Ashes 2023 1st Test, Usman Khawaja and Ollie Robinson involved in heated exchange: ऍशेस 2023 मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 2 विकेट्सने पराभूत केले. ऍजबस्टनला झालेल्या या सामन्यातील विजयाने ऑस्ट्रेलिया आता 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 फरकाने आघाडीवर आहे. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सालामीवीर उस्मान ख्वाजा आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्यात पहिल्या डावात ख्वाजाला 141 धावांवर त्रिफळाचीत केल्यानंतर रॉबिन्सनने त्याच्याविरुद्ध अपशब्द वापरताना जोरदार सेलिब्रेशन केले होते. त्यांच्यातील हे गरमागरमीचे वातावरण दुसऱ्या डावातही कायम राहिल्याचे दिसले.

Usman Khawaja and Ollie Robinson
चूकीला माफी नाही! पहिल्याच Ashes मॅचनंतर ICC ने इंग्लंड - ऑस्ट्रेलियाचे कापले WTC पाँइंट्स

अखेरच्या दिवशी पावसामुळे खेळ सुरु होण्यास उशीर झाला होता. पण खेळ सुरू झाल्यानंतर ख्वाजा खेळपट्टीवर टिकून चांगली फलंदाजी करत होता. यादरम्यान, दुसऱ्या सत्रात ड्रिंक्सब्रेक वेळी ख्वाजा आणि रॉबिन्सन यांच्यात शाब्दिक चकमक घडली.

ते दोघे एकमेकांना उद्देशून बोलताना दिसले होते. ज्यावेळी त्या दोघांमधील हे वाद वाढण्याची चिन्हे दिसायला लागली. त्यावेळी इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडसननने मध्यस्थी केली आणि त्याने रॉबिन्सनला बाजूला नेले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Usman Khawaja and Ollie Robinson
Ashes History: '...आणि इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू झाला', गोष्ट 141 वर्षांपूर्वीच्या 'त्या' पराभवाच्या बदल्याची

ऑस्ट्रेलियाने मिळवला विजय

या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 281 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 92.3 षटकात 2 विकेट्स राखून पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाकडून 9 व्या विकेटसाठी कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी महत्त्वपूर्ण नाबाद 55 धावांची भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळवणे शक्य झाले.

या सामन्यात  इंग्लंडने पहिला डाव 78 षटकात 8 बाद 393 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 116.1 षटकात सर्वबाद 386 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने 66.2 षटकात सर्वबाद 273 धावा केल्या. तसेच पहिल्या डावातील 7 धावांच्या आघाडीमुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 281 धावांचे आव्हान ठेवले होते.

ख्वाजा ठरला सामनावीराचा मानकरी

दरम्यान, पहिल्या ऍशेस सामन्यातील सामनावीराचा मानकरी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा ठरला आहे. त्याने पहिल्या डावात 321 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह 141 धावा केल्या. तसेच दुसऱ्या डावात त्याने 197 चेंडूत 65 धावांची खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com