Dinesh Karthik Dainik Gomantak
क्रीडा

बायकोचं सहकाऱ्यासोबत अफेअर; दिनेश कार्तिक करणार होता आत्महत्या

कार्तिकचा जिवलग मित्र आणि त्याच्या पहिल्या पत्नीने त्याची फसवणूक केली त्यामुळे तो आपल्या आयुष्यावर इतका नाराज झाला की तो आत्महत्येचा विचार करू लागला होता.

दैनिक गोमन्तक

बंगळुरूचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आयपीएल 2022 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. 36 वर्षांचा झालेला आरसीबीचा हा खेळाडू या मोसमात नव्या रूपात खेळताना चाहत्यांना दिसत आहे. तो स्वबळावर सामना पूर्ण करताना दिसत आहे. या वयात खेळाडू जेव्हा निवृत्तीचा विचार करतात, तेव्हा कार्तिकची अशी कामगिरी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. कार्तिक आज ज्या उंचीवर आहे त्या उंचीवर पोहोचणे तितकेसे सोपे नव्हते. (Wifes affair with a colleague Dinesh Karthik was going to commit suicide)

त्याचा जिवलग मित्र आणि त्याच्या पहिल्या पत्नीने त्याची फसवणूक केली त्यामुळे तो आपल्या आयुष्यावर इतका नाराज झाला की तो आत्महत्येचा विचार करू लागला होता.

2007 मध्ये लग्न केले आणि 2012 मध्ये वेगळे झाले

2007 ते 2011 दरम्यान, कार्तिकला टीम इंडियामध्ये महेंद्रसिंग धोनीनंतर (MS Dhoni) यष्टिरक्षक फलंदाज म्हणून दुसरा पर्याय मानले जात होते. धोनीला संघातून विश्रांती मिळाली असती तर कार्तिक विकेटच्या मागे दिसून आला असता. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी इतकी दमदार होती की त्याला तामिळनाडू संघाचा कर्णधार बनवण्यात आले, पण हे सर्व क्षणार्धातच संपुष्टात आले.

दिनेशने 2007 मध्ये त्याची बालपणीची मैत्रिण निकिता वंजाराशी लग्न केले, काही वर्षांनी निकिताचे कार्तिकचा मित्र तसेच सहकारी मुरली विजयसोबत अफेअर सुरू झाले. तर ती मुरलीच्या मुलाची आई होणार होती. ही गोष्ट कार्तिक सोडून तामिळनाडूच्या सर्व खेळाडूंना माहीत होती. अचानक एक दिवस निकिताने कार्तिकला हे सत्य सांगितले आणि घटस्फोट घेण्यास त्याला सांगितले.

दोघांमध्ये घटस्फोट झाल्यानंतर निकिता मुरली विजयसोबत राहायला लागली. मुरलीने आयपीएलमध्ये चेन्नईसाठी चमकदार कामगिरी देखील केली. तो प्रत्येक सामन्यामध्ये धावा करत होता. त्याची टीम इंडियामध्ये देखील निवड झाली होती. आणि त्याचवेळी कार्तिकची कामगिरी सातत्याने घसरायला लागली. त्याला संघातून वगळण्यात आले, खराब फॉर्ममुळे त्याच्याकडून तामिळनाडू संघाचे कर्णधारपद हिसकावून मुरली विजयकडे सोपविण्यात आले, आणि कार्तिक डिप्रेशनमध्ये गेला. तो आपल्या जीवनाने इतका अस्वस्थ झाला की त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला, आणि सामन्यादरम्यान आयपीएलमध्येही त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या.

त्याने जिमला जाणे बंद केले

कार्तिकने त्याचे प्रशिक्षणही सोडून दिले होते, त्याने जिमला जाणेही बंद केले होते. त्याचा ट्रेनर काळजीत पडला आणि त्याच्या घरी पोहोचला. ट्रेनरला कार्तिक एका कोपऱ्यात देवदाससारखी दाढी वाढवून बसलेला दिसला. त्यानंतर, प्रशिक्षकाने त्यांचे प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याचा आग्रह त्याला धरला. कार्तिकने कसा तरी होकार दिला आणि तो जिमला जाण्यास तयार झाला. दिनेशची जिममध्येच दीपिका पल्लीकलची भेट झाली.

आणि त्यानंतर दीपिकाच्या आगमनाने सर्व काही बदलले

दीपिका आणि दिनेश चांगले मित्र बनले, कार्तिकने नेटमध्ये पुन्हा सराव सुरू केला आणि घरच्या सामन्यांमध्येही त्याने धावा काढण्यास सुरुवात केली. दीपिकाने त्याला स्टेप बाय स्टेप सपोर्ट करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा त्याची टीम इंडियासाठी निवड करण्यात करण्यात आली. काही दिवसांनी त्याने दीपिकासोबत लग्न केले, आणि त्यानंतर आयपीएलमध्ये तो कोलकाताचा कर्णधार झाला.

वयाच्या 34 व्या वर्षी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवताना कार्तिकला आपली वेळ क्रिकेट मधील वेळ संपत आल्याचे जाणवले. त्यानंतर त्याला निवृत्त होऊन फक्त फ्रँचायझी क्रिकेट खेळायची होती. यादरम्यानच दीपिका गरोदर राहिली आणि तिने 2021 मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. कार्तिकने खेळणे थांबवले, त्याने कॉमेंट्री करायला सुरुवात केली आणि या क्षेत्रातही त्याचा पूर्ण दबदबा निर्माण झाला असं म्हणायला हरकत नाही.

तर दीपिकामुळे कार्तिकचे स्वप्न पूर्ण झाले

दिनेश कार्तिकचे चेन्नईतील पॉश एरिया असलेल्या पोश गार्डनमध्ये एक आलिशान घर घेण्याचे स्वप्न होते, परंतु त्याची किंमत खूप जास्त होती, तेव्हा दीपिका त्याला म्हणाली, आम्ही दोघे पुन्हा आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करू आणि तुमचे स्वप्न पूर्ण करू दीपिका स्वतः एक स्क्वॅश खेळाडू आहे. तिने कार्तिकसोबत प्रशिक्षण सुरू केले आणि काही दिवसांतच त्यांनी पोस गार्डनमध्ये एक आलिशान घर घेतले.

आयपीएल 2022 मध्ये चेन्नईला कार्तिकला संघात घ्यायचे होते. आयपीएल 2022 पूर्वी चेन्नईच्या संघाने दिनेश कार्तिकशी बोलले होते की त्याला आपल्या संघात घ्यायचे आहे. लिलावादरम्यान हा प्रकार घडला, जरी चेन्नईने कार्तिकवर सातत्याने बोली लावली, पण बेंगळुरू संघाने बाजी मारली. फ्रँचायझीने त्याला 5 कोटी 50 लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले.

त्याच वेळी, दीपिकाने स्क्वॅशमध्ये देखील उत्कृष्ट खेळ दाखवला आणि ग्लासगो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत जोश्ना चिनप्पासह महिला दुहेरी आणि सौरव घोषालची मिश्र दुहेरी दोन्ही जिंकली होती. या आरसीबी स्टारची कथा एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीये. कार्तिकला यंदाही होणाऱ्या टी-20 विश्वचषकात घेण्याची चर्चा रंगत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT