Delhi Capitals vs Punjab Kings: पराभवाची 3 मोठी कारणे, या खेळाडूने केली सर्वाधिक निराशा

नाणेफेक जिंकल्यानंतर कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जचा डाव केवळ 115 धावांत आटोपला.
Delhi Capitals vs Punjab Kings
Delhi Capitals vs Punjab KingsTwitter
Published on
Updated on

कोरोनाच्या सावटाखाली आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स व पंजाब किंग्ज यांच्यातील पुणे येथून मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवण्यात आलेला सामना अखेर काल पार पडला. IPL 2022 मध्ये लीग टप्प्यातील 32 वा सामना 20 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळला गेला. ज्याचे आयोजन मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये करण्यात आले होते. या सामन्यात दिल्लीने पंजाब किंग्जचा 9 गडी राखून पराभव केला, डीसीने सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले होते.

नाणेफेक जिंकल्यानंतर कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जचा डाव केवळ 115 धावांत आटोपला. त्यानंतर डीसीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे दिल्लीने हे लक्ष्य 1 गडी गमावून 10.3 षटकात पूर्ण केले. अशा परिस्थितीत, जाणून घेऊया कोणत्या 3 कारणांमुळे पंजाबला (PBKS) पराभवाला सामोरे जावे लागले.

Delhi Capitals vs Punjab Kings
IPL 2022: BCCI ने घेतला मोठा निर्णय, आता 'इथे' होणार दिल्ली अन् पंजाबचा सामना

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (PBKS) ची मिडल ऑर्डर पत्त्याच्या घराप्रमाणे तुटून पडली होती. एकापाठोपाठ एक विकेट पडत राहिल्या आणि डीसीने सामन्यात आपली पकड मजबूत केली. जितेश शर्माच्या 32 धावांच्या खेळीशिवाय मधल्या फळीत इतर कोणत्याही फलंदाजाने चांगली खेळी खेळली नाही.

मिडिल ऑर्डरमध्ये दिल्लीविरुद्ध लिआम लिव्हिंगस्टोनने हुशारीने फलंदाजी केली नाही किंवा शाहरुख खाननेही त्याचा अनुभव वापरला नाही. हे दोन्ही फलंदाज पंजाबच्या मिडिल ऑर्डरचा कणा आहेत आणि हे दोन्ही फलंदाज डीसीविरुद्ध पूर्णपणे फ्लॉप ठरले. इतकेच नाही तर इतर फलंदाजांनीही दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या फलंदाजीने निराशा केली.

Delhi Capitals vs Punjab Kings
DC vs PBKS: डेव्हिड वॉर्नरनने ड्रेसिंग रूममध्ये घातला राडा; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान काल झालेला दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल 2022 च्या सामन्यापूर्वी , दिल्लीच्या संघात कोविड -19 च्या प्रकरणांमुळे हा सामनाा होणार की नाही याची धाकधूक होती. बीसीसीआयने (BCCI) दिल्ली कॅम्पमध्ये 6 खेळाडू कोविड- पॉझिटिव्ह असूनही सामना होणार असल्याचे सांगितले आणि सामना रंगला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com