कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

आयपीएल 2022 च्या मध्यात घेतलेला निर्णय
Kieron Pollard|International Cricket
Kieron Pollard|International CricketDainik Gomantak
Published on
Updated on

वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या पोलार्डने या स्पर्धेच्या मध्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिज वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार पोलार्डने बुधवारी 20 एप्रिल रोजी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील व्हिडिओद्वारे निवृत्तीची घोषणा केली.

Kieron Pollard|International Cricket
दिल्ली कॅपिटल्सच्या दुसर्‍या सामन्यात ही बदल, 22 एप्रिलला मुंबईत सामना

2007 मध्ये वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पोलार्डने कॅरेबियन संघासाठी सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 224 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने बॅटने 4,000 हून अधिक धावा केल्या, तर त्याने 97 विकेट्सही घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com