Mukesh Kumar X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: ...म्हणून मुकेश कुमार तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियातून बाहेर, BCCI ने सांगितलं कारण

Mukesh Kumar: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीआधी भारतीय संघातून मुकेश कुमारला मुक्त करण्यात आले आहे.

Pranali Kodre

Why Mukesh Kumar released from Team India ahead of 3rd Test against England?

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला रोजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर गुरुवारपासून सुरुवात झाली आहे.

दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय संघातून वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला मुक्त करण्यात आले आहे. याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे.

बीसीसीआयने सांगितले आहे की 'राजकोट कसोटीसाठीच्या भारतीय संघातून मुकेश कुमारला मुक्त करण्यात आले आहे. तो त्याच्या बंगाल रणजी संघात सामील होईल आणि नंतर पुन्हा रांचीत होणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी भारतीय संघात सामील होईल.'

मुकेश इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला होता. या सामन्यात त्याला मोहम्मद सिराजच्या जागेवर संधी देण्यात आलेली.सिराजला दुसऱ्या कसोटीदरम्यान विश्रांती देण्यात आलेली. पण मुकेशला केवळ एकच विकेट घेता आली होती.

दरम्यान, त्याला इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तिन्ही कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात सामील करण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या कसोटीत सिराजला त्याच्याजागेवर पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आल्याने त्याला यादरम्यान रणजी सामना खेळण्यासाठी संघातून मुक्त करण्यात आले.

त्यामुळे आता मुकेश कोलकाताला रवाना झाला आहे. तो 16 फेब्रुवारीपासून बिहारविरुद्ध इडन गार्डन्सवर होणाऱ्या रणजी सामन्यात बंगालकडून खेळेल. या सामन्यानंतर तो 23 फेब्रुवारीपासून रांचीत सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी पुन्हा भारतीय संघात सामील होईल.

भारतीय संघात चार बदल

दरम्यान, तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले आहे. यात सिराजच्या पुनरागमनाव्यतिरिक्त रविंद्र जडेजाचेही पुनरागमन झाले आहे.

जडेजाला अक्षर पटेलच्या जागेवर संधी मिळाली आहे. तसेच सर्फराज खानला श्रेयस अय्यरच्या जागेवर, तर ध्रुव जुरेलला यष्टीरक्षक केएस भरतच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. सर्फराज आणि जुरेल यांनी या सामन्यातून कसोटी पदार्पण केले आहे.

  • तिसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT