IND vs ENG, Video: अखेर नियतीही हरली! अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सर्फराजचे पदार्पण, वडील अन् पत्नीचे पाणावले डोळे

Sarfaraz Khan Debut: इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये होत असलेल्या कसोटीतून भारताकडून सर्फराज खानने पदार्पण झाले आहे. यावेळी त्याच्या वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
Sarfaraz Khan father and wife gets emotional after he make debut for India
Sarfaraz Khan father and wife gets emotional after he make debut for IndiaX/AFP

Sarfaraz Khan father and wife gets emotional after he make debut for India :

भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर सुरू होत असेलल्या या सामन्यातून भारताकडून सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांचे पदार्पण झाले आहे.

सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी सर्फराज आणि जुरेल यांना माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्यात आली. दरम्यान, यावेळी सर्फराजचे वडील नौशाद खान आणि त्याची पत्नी रामना झहुर स्टेडियममध्ये उपस्थित होते.

Sarfaraz Khan father and wife gets emotional after he make debut for India
IND vs ENG: राजकोटमध्ये रंगणार तिसरा कसोटी सामना; जाणून घ्या कसा आहे भारताचा या मैदानावरील रेकॉर्ड

ज्यावेळी सर्फराजला कसोटी पदार्पणाची कॅप मिळाली, तेव्हा त्याचे कुटुंबिय भावूक झाले होते. त्याने ती कॅप नंतर त्याच्या वडिलांना दाखवली तेव्हा ते खूपच भावूक झाले होते आणि त्यांच्या डोळ्यातून मुलाच्या यशाबद्दल आनंदाश्रू देखील वाहिले.

यावेळी सर्फराज त्याच्या वडिलांच्या आणि पत्नीच्या डोळ्यातील पाणी पुसतानाही दिसला. या भावनिक घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, सर्फराजची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्याने सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठ्या धावा उभारल्या होत्या. मात्र, त्याची भारतीय संघात निवड होत नव्हती. अखेर 26 वर्षीय सर्फराजची इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली.

तसेच त्याला या मालिकेतील अखेरच्या तीन सामन्यांसाठीही भारतीय संघात कायम करण्यात आले. दुसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली, त्यामुळे त्याचे कसोटी पदार्पणही झाले.

Sarfaraz Khan father and wife gets emotional after he make debut for India
IND vs ENG: सर्फराज अन् जुरेलचे झाले पदार्पण, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात चार बदल; पाहा प्लेइंग-11

सर्फराजचे नाव गेल्या काही रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सातत्याने वर झळकत होते. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लंड अ संघाविरुद्ध भारतीय अ संघाकडून खेळतानाही चांगली कामगिरी केली होती.

तो इंग्लंड अ संघाविरुद्ध चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळला होता. त्याने पहिल्या सामन्यात अर्धशतक केले होते, तर दुसऱ्या सामन्यात त्याने 161 धावांची शतकी खेळी केली होती.

 सर्फराजने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत आत्तापर्यंत 45 सामने खेळले असून 69.85 च्या सरासरीने 3912 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 5 विकेट्सही घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com