India vs West Indies Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 1st ODI: 'माझ्या पदार्पणावेळी...', रोहितने 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचं सांगितलं खरं कारण

Rohit Sharma: वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेत भारतीय संघाने फलंदाजी क्रमवारीत मोठे बदल करण्यामागील कारण कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma reveal reason behind changes in batting line up in 1st ODI: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात गुरुवारी पहिला वनडे सामना पार पडला. केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात भारताच्या फलंदाजी क्रमवारीत अनेक बदल करण्यात आले. याबद्दल भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर ११५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सलामीला इशान किशन आणि शुभमन गिल आले.

तसेच तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावर हार्दिक पंड्या, पाचव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा, सहाव्या क्रमांकावर शार्दुल ठाकूर आणि सातव्या क्रमांकावर रोहित शर्माने फलंदाजी केली. तसेच विराट कोहली फलंदाजीलाच आला नाही.

साधारत: रोहित सलामीला फलंदाजीला येतो, तर विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. पण भारतीय संघातील या वरिष्ठ खेळाडूंनी खालच्या फळीतील फलंदाजी क्रमांक निवडत सर्वांना चकीत केले होते.

याबद्दल रोहितने सामन्यानंतर सांगितले की आम्ही वनडेत खेळाडूंना खेळण्यासाठी वेळ देऊ इच्छितो. जेव्हाही शक्य होईल, तेव्हा आम्ही अशा गोष्टी आजमावून पाहू. वेस्ट इंडिजला ११५ धावांवर रोखल्यानंतर आम्हाला माहित होते की आम्ही या खेळाडूंना आजमावू शकतो आणि त्यांना संधी देऊ शकतो. मला वाटत नाही की त्यांना अशा संधी जास्त मिळत नाही.'

भारतीय संघाने या मालिकेपासून आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीलाही सुरुवात केली आहे.

दरम्यान, रोहितने या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने त्याच्या पदार्पणाची आठवण आल्याचेही सांगितले. तो म्हणाला, 'मी जेव्हा भारतासाठी माझे पदार्पण केले, तेव्हा ७ व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. मला त्या दिवसांची आठवण झाली.'

भारताची मालिकेत आघाडी

या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ 23 षटकातच 114 धावांवर संपुष्टात आणला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाय होपने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तसेच ऍलिक अथानाझने 22 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून कोणीही 20 धावांचा टप्पा ओलांडला नाही.

भारताकडून कुलदीप यादवने 3 षटके गोलंदाजी करताना केवळ 6 धावा देत 4 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने २२.५ षटकात पूर्ण केला. भारताकडून इशान किशनने 46 चेंडूत 52 धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने 19 धावा, रविंद्र जडेजाने नाबाद 16 धावा आणि रोहित शर्माने नाबाद 12 धावा केल्या. याशिवाय शुभमन गिल (7), हार्दिक पंड्या (5) आणि शार्दुल ठाकूर (1) स्वस्तात बाद झाले.

वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने 2 विकेट्स घेतल्या, तर जेडेन सील्स आणि यानिक कॅरिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

भारताने हा सामना जिंकल्याने मालिकत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना २९ जुलैला होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT