Rohit Sharma | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 3rd ODI: 'करो वा मरो' सामन्यात होणार विराट-रोहितचे पुनरागमन? अशी असेल भारताची संभाव्य Playing XI

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा आणि निर्णायक वनडे सामना मंगळवारी खेळला जाणार आहे.

Pranali Kodre

India's Probable Playing XI for 3rd ODI against West Indies : वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (1 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. या सामना त्रिनिदाद मधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे.

तिसरा वनडे सामना निर्णयाक ठरणार आहे. कारण 3 सामन्यांच्या या वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला होता. तसेच दुसरा वनडे वेस्ट इंडिजने 6 विकेट्सने जिंकला.

त्यामुळे या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर सध्या 1-1 अशी बरोबरी झालेली आहे. त्याचमुळे आता तिसरा सामना मालिका विजेता ठरवण्यासाठी निर्णायक असेल. तिसरा सामना जो संघ जिंकेल, तो ही मालिकाही जिंकेल.

दरम्यान तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

विराट-रोहितचे होणार पुनरागमन?

पहिल्या वनडेत रोहित शर्माने सातव्या क्रमांकावर फलंदाजी केलेली, तर विराट कोहलीने फलंदाजी केली नव्हती. याशिवाय या दोघांनाही दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मात्र या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांनी संघर्ष केल्याचे दिसले होते. पण आता तिसरा वनडे निर्णायक असल्याने या दोन्ही खेळाडूंचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन होऊ शकते.

त्यांचे जर पुनरागमन झाले, तर अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांना आपले स्थान गमवावे लागू शकते. हे दोघेही दुसऱ्या वनडेत रोहित आणि विराट यांच्या जागेवर खेळले होते. पण आता जर रोहित आणि विराटचे पुनरागमन होणार असेल, तर त्यांना पुन्हा बेंचवर बसावे लागू शकते.

याशिवाय भारतीय संघात मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे. भारताकडून इशान किशनने शानदार कामगिरी केल्याने त्याला संघात कायम केले जाऊ शकते. याशिवाय शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादववरही विश्वास कायम ठेवला जाऊ शकतो.

त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळू शकतात. जडेजा फिरकी गोलंदाजीची जबाबदारीही सांभाळताना दिसेल. त्याला साथ कुलदीप यादव देताना दिसू शकतो, तर हार्दिक वेगवान गोलंदाजीमध्ये आपले योगदान देऊ शकतो. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार आणि उमरान मलिक हे गोलंदाजी फळीत कायम राहू शकतो.

तिसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, उमरान मलिक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धारदार शस्त्राने वडिलांचा जीव घेणारा प्रमोद 'मानसिक रुग्ण'; बहिणीचा पोलिसांसमोर खुलासा

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Electricity: फाईव्ह स्टार एसी, Led दिवे; वीज बचतीबाबत सरकारी कार्यालयांसाठी नवी नियमावली

Cash For Job Scam: मंत्र्यांच्‍या कार्यालयांशी जवळीक, म्हणून अनेकजण भुलले 'श्रुतीला'; कष्टाची कमाई गमावली !

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

SCROLL FOR NEXT