WI vs IND, 2nd ODI: 'मी कासव आहे, पण...', पराभवानंतर हार्दिकचे भाष्य; कोच द्रविडनेही दिले स्पष्टीकरण

Hardik Pandya: वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने गोलंदाजीबद्दल हार्दिक पंड्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Hardik Pandya | Suryakumar Yadav
Hardik Pandya | Suryakumar YadavDainik Gomantak
Published on
Updated on

Hardik Pandya react on preparation for the ODI Cricket World Cup 2023:

शनिवारी बार्बाडोसला झालेल्या वनडे सामन्यात भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध ६ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 182 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग वेस्ट इंडिजने 36.4 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.

या पराभवामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्याचमुळे 1 ऑगस्टला होणारा तिसरा वनडे सामना निर्णायक ठरणार आहे.

दरम्यान, शनिवारी सामना संपल्यानंतर भारताचा प्रभारी कर्णधार हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे हार्दिकने या सामन्यात भारतीय संघाने नेतृत्व केले होते. दरम्यान, या सामन्यात भारताने एकून ७ गोलंदाजांचा वापर केला, यामध्ये हार्दिकचाही समावेश आहे.

Hardik Pandya | Suryakumar Yadav
WI vs IND, 2nd ODI: वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं, दुसऱ्या वनडेत भारत पराभूत

हार्दिकने गोलंदाजीचीही धूरा सांभाळताना 6.4 षटकात गोलंदाजी केली. त्याला विकेट मिळाली नसली, तरी त्याने नियंत्रित गोलंदाजी करताना 5.70 ची इकोनॉमी राखली होती. याबद्दलच त्याने सामन्यानंतर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

त्याने सांगितले की तो आगामी 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वर्ल्डकपच्या तयारीसाठी जास्तीत जास्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण यादरम्यान तो घाई करत नसल्याचेही त्याने सांगितले.

तो म्हणाला, 'मला वर्ल्डकपसाठी सज्ज होण्यासाठी जास्त षटके गोलंदाजी करायला हवी. मी सध्या कासव आहे, ससा नाही. आशा आहे की वर्ल्डकपदरम्यान सर्व गोष्टी नीट होतील.' हार्दिक गेल्या काही वर्षांपासून पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्याला त्यावर शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली आहे. त्यामुळे तो गेल्या काही वर्षात फार गोलंदाजी करताना दिसलेला नाही.

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे, याबद्दल हार्दिक म्हणाला, 'त्या सामन्यात खेळाडू तपासले जातील. सध्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे पुढील मालिका प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी रोमांचक असेल.'

Hardik Pandya | Suryakumar Yadav
Rohit Sharma on Virat Kohli: 'संघाच्या आतल्या गोष्टी...', विराटच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच कॅप्टन रोहित शर्मा भडकला

द्रविडचेही स्पष्टीकरण

या सामन्यात रोहित आणि विराटला विश्रांती देण्याबद्दल द्रविडने स्पष्टीकरण दिले आहे. त्याने सांगितले की 'आमचे काही खेळाडू दुखापतीतून सावरत आहेत. त्यांच्या खेळण्याबद्दल अद्याप काहीही निश्चित नाही. अशा परिस्थितीत आम्हाला प्रत्येक परिस्थितीत स्वत:ला तयार ठेवावे लागणार आहे.'

द्रविड म्हणाला, 'आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देत आहोत. आमची इच्छा आहे की सर्वांना सामने खेळायला मिळावेत. आमच्या संघाला वाईटातील वाईट परिस्थितीसाठी स्वत:ला तयार ठेवावे लागणार आहे. त्यामुळे आम्हाला काही खेळाडूंबाबत मोठे निर्णय घेण्यात मदत होईल.'

'सर्वांना माहित आहे की रोहित आणि विराट तर खेळतच आहेत. आशिया चषकापूर्वी आमच्याकडे दोन-तीन सामनेच आहेत. खंर सांगायचे, तर त्यातून आम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. पण आमचे काही खेळाडू दुखापतीमुळे एनसीएमध्ये आहेत. त्यांच्या खेळण्यावर अद्याप प्रश्चचिन्ह आहे. अशाच आम्ही काही खेळाडूंना संधी देत आहोत. त्यामुळे गरज पडल्यास ते तयार असतील.'

सध्या भारताचे जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएल राहुल असे काही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com