Virat Kohli and Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI, 2nd Test: विराटचं शतक, तर जड्डू-अश्विनचं अर्धशतक! भारताने ओलांडल्या 400 धावा, पण विंडिजचं जबरदस्त फाईटबॅक

IND vs WI, 2nd Test: दुसऱ्या दिवशी विराट आणि जडेजा यांच्या विकेट्स गेल्यानंतर विंडिजने चांगले पुनरागमन केले आहे.

Pranali Kodre

West Indies vs India, 2nd Test, 2nd Day Report: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे गुरुवारपासून (२० जुलै) दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याचा शुक्रवारी दुसरा दिवस होता.

दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात 41 षटकात 1 बाद 86 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून कर्णधार क्रेग ब्रेथवेट 37 धावांवर आणि पदार्पणवीर किर्क मॅकेन्झी 14 धावांवर नाबाद आहेत. अद्याप वेस्ट इंडिज संघ 352 धावांनी पिछाडीवर आहे.

भारताचा पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर वेस्ट इंडिज संघ पहिल्या डावात फलंदाजीला उतरला. वेस्ट इंडिजकडून ब्रेथवेटसह तेजनारायण चंद्रपॉलने चांगली सुरुवात करून दिली होती. या दोघांनी सलामीला अर्धशतकी भागीदारीही केली.

पण चंद्रपॉलला अश्विनने 33 धावांवर बाद केले आणि वेस्ट इंडिजची सलामीची 71 धावांची भागीदारी मोडली. पण नंतर दिवसाखेरपर्यंत ब्रेथवेट आणि मॅकेन्झीने भारताला आणखी यश मिळू दिले नाही.

तत्पुर्वी भारताने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 85 षटकापासून आणि 4 बाद 288 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी विराट कोहली 87 धावांवर आणि रविंद्र जडेजा 36 धावांवर नाबाद होता. या दोघांनी पहिल्याच दिवशी शतकी भागीदारी केली होती. दुसऱ्या दिवशीही त्यांनी चांगली फलंदाजी सुरु ठेवली.

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विराटने त्याचे 29 वे कसोटी शतक ठोकले. तसेच जडेजानेही अर्धशतक पूर्ण केले. पण 99 व्या षटकात विराट आणि जडेजाची दीडशतकी भागीदारी तुटली. विराटला एकेरी धाव धावत असताना अल्झारी जोसेफने डायरेक्ट थ्रो करत धावबाद केले. त्यामुळे विराटला 206 चेंडूत 11 चौकारांसह 121 धावा करून माघारी परतावे लागले.

त्यानंतर काही वेळातच 104 व्या षटकात जडेजाला केमार रोचने यष्टीरक्षक जोशुआ डा सिल्वाकडे झेल देण्यास भाग पाडले. जडेजाने 152 चेंडूच 5 चौकारांसह 61 धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र आर अश्विन वगळता भारतीय फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्या.

ईशान किशनला 25 धावांवर जेसन होल्डरने माघारी धाडले, तर जयदेव उनाडकट 7 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराज शुन्यावर माघारी परतला. अखेरीस आर अश्विनने अर्धशतक झळकावले. पण त्याला केमार रोचने त्रिफळाचीत करत भारताचा डाव संपुष्टात आणला.

अश्विनने 78 चेंडूत 8 चौकारांसह 56 धावांची खेळी केली. भारताने पहिल्या डावात 128 षटकात सर्वबाद 438 धावा केल्या.

वेस्ट इंडिजकडून केमार रोच आणि जोमेल वॉरिकन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच जेसन होल्डरने 2 विकेट्स आणि शॅनन गॅब्रिएलने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT