Virat Kohli: 'रनमशीन' विराटचा 500 व्या सामन्यात कोणालाही न जमलेला पराक्रम, 'या' 3 विक्रमांनाही गवसणी

IND vs WI, 2nd Test: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी नाबाद अर्धशतकी खेळी करताना विराट कोहलीने अनेक दिग्गजांना मागे टाकत 3 मोठे विक्रम केले आहेत.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

West Indies vs India, 2nd Test, Virat Kohli 3 big records: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात गुरुवारपासून (20 जुलै) त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीने अर्धशतक करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात 84 षटकात 288 धावा झाल्या आहेत. पहिल्या दिवसाखेर भारताकडून विराट कोहली 87 धावांवर आणि रविंद्र जडेजा 36 धावांवर नाबाद आहेत. 

Virat Kohli
Virat Kohli: किंग कोहली @500! वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरताच होणार सचिन-धोनीच्या पंक्तीत सामील

दरम्यान, हा सामना विराटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 500 वा सामना आहे. तो 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील 10 आणि भारताचा चौथा क्रिकेटपटू ठरला. त्याच्यासाठी हा सामना आणखीच खास ठरला आहे.

त्याने त्याचा 500 व्या सामन्यात 50 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा पराक्रम करणाऱ्या 9 क्रिकेटपटूंना त्यांच्या 500 व्या सामन्यात अर्धशतक करता आले नव्हते.

जॅक कॅलिसला टाकले मागे

विराटने पहिल्या दिवसाखेर नाबाद 87 धावांची खेळी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवले. त्याने या खेळीदरम्यान आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 25500 धावांचा टप्पा पार केला.

याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जॅक कॅलिसच्या 25534 धावांच्या विक्रमाला मागे टाकले. विराटच्या 20 जुलै 2023 पर्यंत 559 डावात 25548 धावा झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू

  • 34357 धावा - सचिन तेंडुलकर

  • 28016 धावा - कुमार संगकारा

  • 27483 धावा - रिकी पाँटिंग

  • 25957 धावा - माहेला जयवर्धने

  • 25548 धावा - विराट कोहली

  • 25534 धावा - जॅक कॅलिस

Virat Kohli
IND vs WI, 2nd Test: रोहित-यशस्वीची फिफ्टी, विराट शतकाच्या जवळ; पण 43 धावांत 4 विकेट्स घेत विंडिजचंही पुनरागमन

विरेंद्र सेहवागच्या विक्रमालाही धक्का

विराट कोहलीने विरेंद्र सेहवागच्या एका विक्रमालाही मागे टाकले आहे. विराट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सेहवागला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर आला आहे.

विराटचे आता कसोटीत 20 जुलै 2023 पर्यंत 111 कसोटीतील 187 डावात 8642 धावा झाल्या आहेत. त्यामुळे त्याने सेहवागच्या 8586 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू

  • 15921 धावा - सचिन तेंडुलकर

  • 13288 धावा - राहुल द्रविड

  • 10122 धावा - सुनील गावसकर

  • 8781 धावा - व्हीव्हीएस लक्ष्मण

  • 8642 धावा - विराट कोहली

  • 8586 धावा - विरेंद्र सेहवाग

चौथ्या क्रमांकावर दमदार कामगिरी

विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये बरीच वर्षे नियमितपणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. त्यामुळे आता त्याने कसोटीत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही पाचवा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या 20 जुलै 2023 पर्यंत कसोटीत चौथ्या क्रमांकावर 7097 धावा झाल्या आहेत.

कसोटीत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू

  • 13492 - सचिन तेंडुलकर

  • 9509 - माहेला जयवर्धने

  • 9033 - जॅक कॅलिस

  • 7535 - ब्रायन लारा

  • 7097 - विराट कोहली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com