India vs West Indies
India vs West IndiesDainik Gomantak

IND vs WI, 2nd Test: भारत-वेस्ट इंडिज संघात मोठा बदल! ऐतिहासिक कसोटीतून दोन खेळाडूंचे पदार्पण, पाहा Playing XI

India vs West Indies: गुरुवारपासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसऱ्या कसोटीतून दोन खेळाडूंचे पदार्पण झाले आहेत.
Published on

India vs West India, 2nd Test, Playing XI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात गुरुवारपासून (20 जुलै) कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरु झाला आहे. हा सामना त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे होत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. भारताकडून मुकेश कुमारचे पदार्पण झाले आहे. त्याला शार्दुल ठाकूरच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

शार्दुलला छोटी दुखापत असल्याचे भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीवेळी माहिती दिली. हा एकच बदल भारतीय संघव्यवस्थापनाने केला आहे. दरम्यान मुकेश कुमारचे हे आंतरराष्ट्रीय पदार्णपणही ठरले आहे. त्यामुळे भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा तो 395 वा खेळाडू ठरला आहे. तसेच कसोटी पदार्पण करणारा 308 वा खेळाडू ठरला आहे.

India vs West Indies
IND vs WI: ऐतिहासिक कसोटीआधी रोहित म्हणतो, 'तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता...'

तसेच वेस्ट इंडिजने काही बदल केले असून शॅनन गॅब्रिएलचे संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय किर्क मॅकेन्झीचे वेस्ट इंडिजकडून कसोटी पदार्पण झाले आहे. 22 वर्षीय मॅकेन्झी वेस्ट इंडिजकडून कसोटी पदार्पण करणारा 334 वा खेळाडू ठरला आहे.

विशेष सामना

हा सामना भारत आणि वेस्ट इंडिज संघांसाठी खास आहे. कारण हा दोन्ही संघात होणारा 100 वा कसोटी सामना आहे. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 99 कसोटी सामने झाले आहेत. या 99 सामन्यांपैकी भारतीय संघाने 23 सामने जिंकले आहेत, तसेच 30 सामने पराभूत झाले आहेत. याशिवाय 46 सामने अनिर्णित राहिले आहेत.

India vs West Indies
Virat Kohli: किंग कोहली @500! वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरताच होणार सचिन-धोनीच्या पंक्तीत सामील

वेस्ट इंडिजची प्रतिष्ठा पणाला

दरम्यान, भारतीय संघाने या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघ 1-0 असा आघाडीवर आहे. त्याचमुळे दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला, तर भारतीय संघ मालिकेत विजय मिळवेलच पण वेस्ट इंडिजला व्हाईटवॉशही देईल.

तसेच हा सामना अनिर्णित राहिला, तरी भारतीय संघ मालिकेवर कब्जा करेल. त्यामुळे मालिकेतील पराभव आणि व्हाईटवॉश टाळण्यासाठी वेस्ट इंडिजला दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • भारत - यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज

  • वेस्ट इंडिज - क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), तेजनारायण चंद्रपॉल, किर्क मॅकेन्झी, जर्मेन ब्लॅकवुड, ऍलिक अथानाझ, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॅरिकन, शॅनन गॅब्रिएल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com