R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

R Ashwin: स्टेनगनलाही अश्विनची फिरकी पडली भारी! 5 विकेट्सह 'हा' पराक्रम करणारा तिसराच भारतीय

IND vs WI, 1st Test: आर अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी 5विकेट्स घेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

R Ashwin joins Harbhajan Singh and Anil Kumble in a elite List: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. डॉमिनिकाला होत असलेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी आर अश्विनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून पहिल्या डावात आर अश्विनने 2.40 च्या इकोनॉमी रेटने 60 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. त्याने वेस्ट इंडिजच्या तेजनारायण चंद्रपॉल, कर्णधार क्रेग ब्रेथवेट, अल्झारी जोसेफ, एलिक अझानाझ आणि जोमेल वॉरिकन यांना बाद केले.

दरम्यान, अल्झारी जोसेफ हा अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 700 वी विकेट ठरला. अश्विनने गोलंदाजी केलेल्या 53 व्या षटकात त्याचा झेल जयदेव उनाडकटने बॅकवर्ड पाँइंटला त्याचा झेल घेतला.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेणारा भारताचा अनिल कुंबळे (956 विकेट्स) आणि हरभजन सिंगनंतर (711 विकेट्स) तिसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

जलद 700 विकेट्स

याशिवाय अश्विनने त्याच्या कारकिर्दीतील 271 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना 351 डावात 700 विकेट्सचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो सामन्याच्या आणि डावांच्या तुलनेतही सर्वात जलद 700 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणार दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन आहे. मुरलीधरनने 264 सामन्यांमध्ये आणि 308 डावांमध्ये 700 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

अश्विनने मोडला स्टेनचा विक्रम

अश्विनने स्टेनगन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेल स्टेनलाही सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मागे टाकले आहे. अश्विन 700 विकेट्स घेणारा जगातील 16 वा खेळाडू ठरला आहे.

त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्टेनला मागे टाकत 16 वा क्रमांक मिळवला आहे. स्टेनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 265 सामन्यांमध्ये 699 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताचे पहिल्या दिवशी वर्चस्व

पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 64.3 षटकात 150 धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजकडून अथानाझने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 20 धावा केल्या.

या दोघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून या डावात कोणालाही 20 धावांचाही टप्पा गाठता आला नाही. भारताकडून अश्विनव्यतिरिक्त रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट् घेतली.

तसेच भारताने पहिल्या दिवसाखेर 23 षटकात बिनबाद 80 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 70 धावांनी मागे आहे. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा पहिल्या दिवशी 65 चेंडूत 30 धावा करून नाबाद आहे. तसेच पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल 73 चेंडूत 40 धावा करून नाबाद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT